राजकीय

आपण राज्यात शांती, प्रेम प्रस्थापित राहो यासाठी प्रयत्न करूया : जयंत पाटील

राज्यात दंगली व्हाव्यात, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण व्हावा यासाठी काही लोकं प्रयत्न करत आहे. त्यांच्या या डावात आपल्याला फसायचे नाही. आपण राज्यात शांती, प्रेम प्रस्थापित राहो यासाठी प्रयत्न करूया आणि आपला सामाजिक एकोपा जपूया असे आवाहन पाटील यांनी केले.

टीम लय भारी

आपण राज्यात शांती, प्रेम प्रस्थापित राहो यासाठी प्रयत्न करूया : जयंत पाटील

सांगली : उरुण-इस्लामपूर शहरातील ईदगाह व शादीखाना कामाचा शुभारंभ सोहळा पार पडला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant patil ) यांनी या प्रसंगी जनतेशी संवाद साधला. राज्यात दंगली व्हाव्यात, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण व्हावा यासाठी काही लोकं प्रयत्न करत आहे. त्यांच्या या डावात आपल्याला फसायचे नाही. आपण राज्यात शांती, प्रेम प्रस्थापित राहो यासाठी प्रयत्न करूया आणि आपला सामाजिक एकोपा जपूया असे आवाहन पाटील  (Jayant patil ) यांनी केले.

महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर अल्पसंख्याक विभागामार्फत हे काम मंजूर करून घेतले होते. अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांची मोठी साथ लाभली. खरंतर ते आज या कार्यक्रमाला पाहिजे होते मात्र सूडबुद्धीने त्यांच्यावर कारवाई करून जेलमध्ये टाकण्याचे काम अस्वस्थ मंडळींनी केले आहे असेही जयंत पाटील (Jayant patil ) यांनी स्पष्ट केले.

मुस्लिम बांधवांनी प्रगती करावी यासाठी आमचा सर्वांचाच कायम प्रयत्न राहिला आहे. या समाजातील लोक शैक्षणिक क्षेत्रातही पुढे जावे यासाठी आम्ही काम करत आहोत. म्हणून येत्या काळात या भागातील उर्दु माध्यमिक शाळेचाही विकास करणार आहोत असे आश्वासन जयंत पाटील यांनी दिले.

हे सुद्धा वाचा: 

ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचे खरे मारेकरी भाजपा व फडणवीस सरकारच !: नाना पटोले

Tamil Nadu’s Famous ‘Idli Amma’ Gets New Home, Courtesy Anand Mahindra

Tags

आणखी वाचा

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close