28 C
Mumbai
Friday, March 29, 2024
Homeमहाराष्ट्रराष्ट्रवादी पक्ष आपल्याला महाराष्ट्रातील सर्वात मोठा पक्ष करायचा  आहे : जयंत पाटील

राष्ट्रवादी पक्ष आपल्याला महाराष्ट्रातील सर्वात मोठा पक्ष करायचा  आहे : जयंत पाटील

टीम लय भारी

मुंबई: आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा २३ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तुम्हा सर्वांचे कष्ट… प्रयत्न… जिद्द… यातूनच आपला पक्ष इथपर्यंत आला आहे याची आम्हा सर्वांना जाणीव असून राष्ट्रवादी हा पक्ष आपल्याला महाराष्ट्रातील सर्वात मोठा पक्ष करायचा आहे. यासाठी एकसंघपणे प्रयत्न करूया असे आवाहन प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी सर्व कार्यकर्त्यांना केले. Jayant Patil NCP the largest party in Maharashtra

 कार्यकर्त्यांच्या एकजुटीने पक्षाला मिळालेल्या उभारीबद्दल जयंत पाटील यांनी सर्वांचे आभार मानले. आपला पक्ष तेवीस वर्षांचा झाला आहे. आपल्या पक्षामध्ये महाराष्ट्रातील नव्या पिढीला भविष्यातील आशा दिसत आहे. अनेक तरूण पक्षात काम करण्यास इच्छुक आहेत. आदरणीय शरद पवारसाहेब यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे काम सुरु आहे, हे पक्ष वाढण्याचे एकमेव कारण आहे असेही जयंत पाटील म्हणाले.

 २३ वर्षांपूर्वी पक्ष स्थापन करताना राज्यात पक्षाच्या ताकदीवर आपली सत्ता स्थापन होईल असा निर्धार केला होता याची आठवणही सांगितली. राज्यातील सर्व घटकांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीकडून होईल अशी अपेक्षाही जयंत पाटील यांनी व्यक्त केली

या कार्यक्रमाला खासदार सुप्रियाताई सुळे, आमदार शेखर निकम, कोषाध्यक्ष हेमंत टकले, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, माजी खासदार माजिद मेमन, मुंबई विभागीय कार्याध्यक्ष राखी जाधव,नरेंद्र राणे, प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव, युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, अल्पसंख्याक सेल प्रदेशाध्यक्ष मोहम्मद खान पठाण, लीगल सेल प्रदेशाध्यक्ष आशिष देशमुख, ग्रंथालय सेल प्रदेशाध्यक्ष उमेश पाटील, सेवा दल कार्याध्यक्ष जानबा म्हस्के, प्रदेश सरचिटणीस अविनाश आदिक,माजी आमदार प्रकाश गजभिये, माजी आमदार संजय दौंड, आयटी सेल राज्यप्रमुख नीरज महांकाळ, महिला प्रदेश सरचिटणीस भावना घाणेकर, मुंबई विभागीय महिला अध्यक्ष सुरेखा पेडणेकर, मुंबई विभागीय युवक अध्यक्ष निलेश भोसले, मुंबई विभागीय अल्पसंख्याक सेल अध्यक्ष सोहेल सुभेदार, तसेच पक्षाचे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

हे सुद्धा वाचा: 

राज्याची शोभा होईल अशी ही राज्यसभा निवडणूक :  मनसे नेते गजानन काळे

“Will Know By 7 PM”: Huge Suspense In Shiv Sena vs BJP Rajya Sabha Fight

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी