29 C
Mumbai
Saturday, April 20, 2024
Homeटॉप न्यूजमहाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पाणी पोहोचावे यासाठी जलसंपदा विभाग काम करत आहे

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पाणी पोहोचावे यासाठी जलसंपदा विभाग काम करत आहे

टीम लय भारी 

मुंबई:  राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी विधानसभेत २६३ अन्वये अनुदान मागणीवर चर्चा केली. विधानसभेतील सर्व सदस्यांनी या चर्चेत भाग घेतला व अनेक चांगल्या सुचना केल्या. विधानसभेतील लक्षवेधी सूचनेवर उत्तर देताना केला.महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पाणी पोहोचावे यासाठी शासनाचे जलसंपदा विभाग काम करत आहे. दोन नदीजोड योजना प्रस्तावित आहेत त्यासाठी अहवाल तयार केला जात आहे. या दोन्ही नदी जोड योजनांची कामे आम्ही तात्काळ सुरू करू. गोदावरी खोऱ्यात जसं शक्य होईल तसं पाणी आणू असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.

त्यांनी म्हटलं की, जायकवाडी धरणाचे दोन्ही कालवे अत्याधुनिक करण्याचा आमचा प्रयत्न आहे. हे काम पूर्ण झाले तर मराठवाड्यातील पाणी टंचाई असलेल्या भागांना पाणी मिळेल. मराठवाड्याकडे संपूर्ण लक्ष केंद्रीत केले आहे, मराठवाड्यातील पाण्याचा दुर्भिक्ष आम्हाला कमी करायचा आहे. गोदावरी थट कालवा दुरुस्तीच्या कामाला महाविकास सरकारमध्ये गती मिळाली, पुढील दोन वर्षात मोठे काम होईल असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.

पाटील यांनी म्हटलं की, महाविकास शासन आल्यापासून निळवंडे धरणाच्या कामाला मोठी गती मिळाली. कोविडच्या काळात आर्थिक चणचण असताना या प्रकल्पासाठी ८२३ कोटी ७२ लाख रुपये दिले गेले तर यंदाही २२-२३ वर्षी ३६५ कोटीची तरतूद आहे. निळवंडेच्या डाव्या कालव्याचे व  उजव्या कालव्याचे ७५% काम पूर्ण झाले आहे. निळवंडे काम पूर्ण झाले पाहिजे यासाठी शासनाने विशेष प्राधान्य दिले जाणार आहे.

त्यांनी म्हटलं की, जायकवाडी धरणाचे दोन्ही कालवे अत्याधुनिक करण्याचा आमचा प्रयत्न आहे. हे काम पूर्ण झाले तर मराठवाड्यातील पाणी टंचाई असलेल्या भागांना पाणी मिळेल. मराठवाड्याकडे संपूर्ण लक्ष केंद्रीत केले आहे, मराठवाड्यातील पाण्याचा दुर्भिक्ष आम्हाला कमी करायचा आहे. गोदावरी थट कालवा दुरुस्तीच्या कामाला महाविकास सरकारमध्ये गती मिळाली, पुढील दोन वर्षात मोठे काम होईल असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी