मनोरंजन

‘जयेशभाई जोरदार’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित; रणवीर सिंह प्रमुख भूमिकेत

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता रणवीर सिंहच्या जयेशभाई जोरदार ह्या दमदार विनोदी चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. 'जयेशभाई जोरदार' चित्रपटाचा ट्रेलर पाहून असे लक्षात येते की चित्रपटामध्ये स्त्रीभ्रूण हत्या हा मुद्दा संपूर्ण चित्रपट आधारित आहे.

टीम लय भारी 

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता रणवीर सिंहच्या जयेशभाई जोरदार (Jayeshbhai jordaar) ह्या दमदार विनोदी चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. ‘जयेशभाई जोरदार’ चित्रपटाचा ट्रेलर पाहून असे लक्षात येते की चित्रपटामध्ये स्त्रीभ्रूण हत्या हा मुद्दा संपूर्ण चित्रपट आधारित आहे.  (Jayeshbhai jordaar film trailer release)

'जयेशभाई जोरदार' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित; रणवीर सिंह प्रमुख भूमिकेत

जयेशभाई जोरदार (Jayeshbhai jordaar) या चित्रपटामध्ये रणबीरनं जयेशभाई ही मुख्य भूमिका साकारली असून अभिनेता बोमन इराणी जयेशभाई याच्या वडिलाची आणि गावाच्या सरपंचाची भूमिका साकारली आहे. अभिनेत्री शालिनी पांडेनं जयेशभाईच्या पत्नीची भूमिका या चित्रपटामध्ये साकारली आहे. तसेच रत्ना पाठक आणि दीक्षा जोशी हे कलाकार देखील या चित्रपटामध्ये महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

 ट्रेलरमध्ये काय आहे? 

प्रदर्शित झालेल्या ट्रेलरमध्ये जयेशभाईचे (Jayeshbhai jordaar) वडील हे गावचं संरपंच दाखवले आहेत. त्यामुळे त्यांच्यानंतर या सरपंचपदाची खुर्ची जयेशभाई सांभाळणार आहे. मात्र, जयेशभाईला मुलगी असल्यामुळे या खुर्चीचा आणि घराचा वारसाहक्क कोण चालवणार हा मोठा प्रश्न निर्माण झालेला असतो. यामध्येच जयेशभाईची बायको पुन्हा प्रेग्नंट असल्यामुळे यावेळी तरी मुलगा जन्माला यावा यासाठी घरातले प्रयत्न करतात. मात्र, मुलगा-मुलगी भेद करणं योग्य नाही.

जे काही आहे ते देवाच्या हातात आहे असं म्हणत जयशेभाई वडिलांना आणि आईला समजवायाचा प्रयत्न करतो. मात्र, हे प्रयत्न अपयशी ठरल्यामुळे तो पत्नी व मुलीला घेऊन घरातून पळून जातो. मात्र, त्याचे वडील त्याला शोधून काढतात. विशेष म्हणजे वडिलांनी शोधल्यानंतर बाळाला काही झालं तर मी स्वत: बरंवाईट करुन घेईन अशी (Jayeshbhai jordaar) धमकीही जयेशभाई देतो.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ranveer Singh (@ranveersingh)

 

हे सुद्धा वाचा :- 

Ranveer Singh says Deepika Padukone goes through his calendar to fix his ‘zero work-life balance’

सिल्व्हर ओकवरील हल्ला म्हणजे माझ्या आईवर हल्ला : खासदार सुप्रिया सुळे

Tags

आणखी वाचा

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close