30 C
Mumbai
Thursday, March 28, 2024
HomeराजकीयJaykumar Gore : तहसिलदाराच्या निलंबनासाठी आक्रमक झालेल्या आमदार जयकुमार गोरे यांनी मायणी...

Jaykumar Gore : तहसिलदाराच्या निलंबनासाठी आक्रमक झालेल्या आमदार जयकुमार गोरे यांनी मायणी वैद्यकीय महाविद्यालयाचाही भ्रष्टाचार विधानसभेत मांडावा !

टीम लय भारी

मुंबईमाण तालुक्याच्या तहसिलदारांना निलंबीत करावे यासाठी जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांनी विधानसभेत जोरदार आवाज उठवला. जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांनी आता भ्रष्टाचारविरोधी मोहिम जोरदारपणे राबवायला हवी. त्यासाठी त्यांनी मायणी येथील वैद्यकीय महाविद्यालयात झालेल्या भ्रष्टाचाराची लक्तरे विधानसभेच्या वेशीवर नेऊन टांगावीत, अशा भावना व्यक्त होत आहेत (Jaykumar Gore should expose medical college corruption).

वाळू तस्करांच्या मुद्द्यावर आमदार जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांनी गुरूवारी विधानसभेत जोरदार आवाज उठवला होता. तहसिलदारांचे निलंबन करण्यासाठी जयकुमार गोरे फार आग्रही होते. ‘विभागीय आयुक्तांकरवी चौकशी केली जाईल. अन् त्यात तहसिलदार दोषी आढळले तर त्यांच्यावर कारवाई करू’ असे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी वारंवार सांगितले. पण त्यानंतरही तहसिलदारांच्या निलंबनाचा मुद्दा ते पुन्हा पुन्हा पुढे रेटत होते.

त्या पार्श्वभूमीवर जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांच्या मतदारसंघात उलटसूलट प्रतिक्रीया उमटत आहेत. माण – खटावमध्ये सुरू असलेला भ्रष्टाचार पूर्णपणे मोडून काढण्याचे ‘पेटंट’ आमदार जयकुमार गोरे यांनी स्वतःकडे घेतलेले आहे. त्यांनी वाळू तस्करीचा पूर्णपणे नि:पात करावा.

पण त्या सोबत मायणी येथील वैद्यकीय महाविद्यालयाचाही भ्रष्टाचारही चव्हाट्यावर आणावा. ‘मढ्याच्या टाळूवरील लोणी खाणे’ ही म्हण मायणी महाविद्यालयाने तंतोतंत खरी करून दाखविली आहे. या महाविद्यालयातील अनागोंदी कारभारामुळे देशात खटाव तालुक्याची बदनामी झाली आहे. त्यामुळे या महाविद्यालयाच्या विरोधात त्यांनी विधानसभेत जोरदार आवाज उठवायला हवा. आमदार जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांनी विधानसभेत आवाज उठवला तर या महाविद्यालयात भ्रष्टाचार करणाऱ्या एका भ्रष्टाऱी नेत्याला तुरूगांची हवा खावी लागेल. जयकुमार गोरे यांनी हे मोठे कार्य लवकरात लवकर हाती घ्यायला हवे, अशाही भावना जनतेतून व्यक्त केल्या जात आहेत.

जयकुमार गोरे हे स्वतःच या महाविद्यालयाचे विश्वस्त आहेत. त्यामुळे तर त्यांनी आपल्या संस्थेसाठी हे कार्य नैतिकदृष्ट्या लवकर हाती घ्यायला हवे.जुन्या विश्वस्तांकडून नव्या विश्वस्तांनी महाविद्यालय ताब्यात घेतले आहे. त्यात जुन्या विश्वस्तांच्या खोट्या स्वाक्षरी केल्या आहेत. काही मृत विश्वस्तांच्याही स्वाक्षरी झालेल्या आहेत.

नव्या विश्वस्तांनी जुन्या विश्वस्तांसोबत आर्थिक सौदा केला होता. तो किती रकमेचा सौदा होता. त्यातील किती रक्कम अद्याप दिली गेलेली नाही, हे विधानसभेत समोर यायला हवे.या महाविद्यालयाने ‘कोरोना’ काळात खोटे रूग्ण, खोट्या चाचण्या दाखवून मोठा भ्रष्टाचार केला आहे. मढ्याच्या टाळूवरील लोणी ओरपण्याचे काम या महाविद्यालयातील नव्या विश्वस्तांनी केले आहे. या निर्लज्ज व बेशरम नव्या विश्वस्तांवर कारवाई होण्यासाठी जयकुमार गोरे यांनी विधानसभेत प्रश्न मांडायला हवा.

‘कोरोना’ काळात मायणी वैद्यकीय महाविद्यालयात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी सुरू आहे. पण ही चौकशी अजून पूर्ण का झाली नाही, यासाठी जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांनी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना सभागृहात धारेवर धरायला हवे.तहसिलदारांच्या बदलीसाठी जयकुमार गोरे बाळासाहेब थोरात यांच्याकडे आग्रही मागणी करीत होते. तसाच आग्रह त्यांनी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडेही धरावा, अशा भावना माण – खटावमधील जनतेतून व्यक्त होत आहेत.(Jaykumar Gore should expose medical college corruption)

भारतीय राज्य संघननेनुसार कायदेमंडळाला म्हणजे विधीमंडळाला वेगळे अधिकार आहेत. विधीमंडळाच्या अधिकारांवर न्यायालय सुद्धा टाच आणू शकत नाही. विधीमंडळात आमदार जे बोलतात त्याचे एक वेगळे महत्व आहे. त्यामुळे आमदार जयकुमार गोरे यांनी विधीमंडळात मायणी वैद्यकीय महाविद्यालयाचा भ्रष्टाचार मांडल्यास त्याला वेगळे महत्व प्राप्त होईल, अशा भावना जनतेतून व्यक्त होत आहेत.


हे सुद्धा वाचा – 

‘Tainted’ state govt officials suspended

 Balasaheb Thorat : महसूल मंत्री बाळासाहेब थोरातांनी आमदार जयकुमार गोरेंची घेतली फिरकी…

भाजप आमदार जयकुमार गोरेला पत्रकार तुषार खरात यांचे झणझणीत प्रत्युत्तर

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा भाजपला दणका, खंडणी व जमीन घोटाळ्याप्रकरणी आमदार जयकुमार गोरेची चौकशी करण्याचे पोलिसांना आदेश

सुभाष देसाई हे प्रत्येक शिवसैनिकांसाठी आदर्श, अजित पवारांकडून कौतुकौद्गार

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी