32 C
Mumbai
Tuesday, April 23, 2024
Homeराजकीयभोंग्याच्या मागून कोण बोलतंय? हे सर्वांना कळतंय : जितेंद्र आव्हाड

भोंग्याच्या मागून कोण बोलतंय? हे सर्वांना कळतंय : जितेंद्र आव्हाड

टीम लय भारी

मुंबई: गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी सध्याच्या राजकारणावर भाष्य केले आहे. यावळी त्यांनी नाव न घेता राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. भोंगा हा फक्त दंगल माजविण्यासाठी निर्माण झालेला आहे. भोंग्याच्या मागून कोण बोलतंय, हे सर्वांना कळतंय त्यामुळे या विषयाला अधिक महत्त्व देऊ नका आव्हाडांनी (Jitendra Awhad) म्हटलं  आहे.

 राज्यात आणि देशात न देता नोकऱ्या किती गेल्या याचे मोजमाप आहे का?  याकडे लक्ष द्या असं आवाहन गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे.  सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय सर्वांना मान्य झालाच पाहिजे. समाज व धर्म कोणताही असो सर्वोच्च न्यायालय सुप्रीम आहे. सर्वोच्च न्यायालयाचे आदेश सर्वांना ऐकावेच लागतील असेही जितेंद्र आव्हाड  असं ही म्हटलं आहे.

देशातील वाढत्या महागाईवर आमदार आव्हाड यांनी चिंता व्यक्त केली आहे. या देशातील महागाई विषयी कुणी बोलत नाही. पेट्रोलचे दर १२५ रुपयांवर गेलेत, त्याबद्दल कुणी बोलत नाही असा सवाल त्यांनी विचारला आहे. २०१४ रोजी पेट्रोलचा दर ७१ रुपये होता. त्यावेळी ४१० रुपयांना मिळणारा गॅस सिलेंडर आज हजाराच्यावर आहे. पेट्रोल-डिझेल-सीएनजी महाग झाल्यामुळे दळणवळण महाग होतं त्यामुळे भाजीपाला, अन्नधान्याच्या किंमती वाढतात असंही जितेंद्र आव्हाड म्हणाले आहे.

 या देशातील तरुणांना दंगलीच्या वाटेवर नेऊन सामान्य माणसांना देशोधडीला लावायचे हा प्रकार मला तरी अमान्य असल्याचे जितेंद्र आव्हाड म्हटलं आहे.आज देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी देशाच्या महागाईबाबत बोलताना जी प्रतिक्रिया दिली आहे. ती ऐकून संताप येत आहे. याप्रसंगी त्यांनी केंद्र सरकारच्या धोरणावर जोरदार टीका केली आहे.

हे सुद्धा वाचा

जितेंद्र आव्हाडांनी नाशिक म्हाडाचा घोटाळा बाहेर काढला, अन् जनतेसाठी ५००० घरे उपलब्ध झाली

In pics: BJP workers protest outside Jitendra Awhad’s Thane bungalow

सीएनजीच्या वाढत्या दरामुळे सामान्य प्रवाशांना फुटला घामटा | CNG Rate | CNG today price|

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी