31 C
Mumbai
Friday, March 29, 2024
Homeमहाराष्ट्रभोंगे लावून किंवा हटवून महागाई कमी होणार आहे का?- जितेंद्र आव्हाडांची खोचक...

भोंगे लावून किंवा हटवून महागाई कमी होणार आहे का?- जितेंद्र आव्हाडांची खोचक टिका

टीम लय भारी 

ठाणे : राजकारण म्हणजे फक्त निवडणुका नसतात; तर, दैनंदिन जीवनात लोकांच्या अडचणी आपण कशा वेगाने सोडवू शकतो, त्यांना होणारा त्रास आपण कसा कमी करु शकतो, हेच म्हणजे राजकारण आहे. परंतू महाराष्ट्रातील काही नेत्यांनी धर्माचा खेळ मांडला आहे. आज भोंग्यांपेक्षा अनेक मोठ्या अडचणी या देशात आहेत. जातीय तेढ माजवून या देशातील बेरोजगारी जाणार आहे का? भोंगे लावून किंवा हटवून महागाई कमी होणार आहे का? असा सवाल करीत आपल्या दरवाजात एखादा माणूस मदतीसाठी आला तर महाराष्ट्र धर्म पाळून त्याला मदत करा, अशा सूचनाही गृहनिर्माण तथा अल्पसंख्यांक मंत्री ना. डॉ. जितेंद्र आव्हाड(Jitendra Awhad)  यांनी कार्यकर्त्यांना केल्या. (Jitendra Awhad criticism on the current situation in Maharashtra)

भोंग्यांच्या प्रश्नावर ना. डॉ.आव्हाड (Jitendra Awhad) म्हणाले की, आज भोंग्यांपेक्षा अनेक मोठ्या अडचणी या देशात आहेत. जातीय तेढ माजवून या देशातील बेरोजगारी जाणार आहे का? भोंगे लावून किंवा हटवून महागाई कमी होणार आहे का? पण, आपणाला मृगजळात अडकविण्यात आलेले आहे. एकवर्षापूर्वी कोविडमुळे अनेकजण रुग्णालयात होते. अनेकांची प्रेतांवर कोणी अंत्यसंस्कार केले, नातेवाईकांनाही कळले नाही. जे रुग्णालयात राहिले; त्यांची देखभाल कोणी केली? रुग्णांना प्लाझ्मा कोणी दिला? आपण रेमडेसीवर वाटताना जात-धर्म पाहिला नव्हता.

पण, आज एक वर्षानंतर कोविडमध्ये माणुसकी दाखविणारा समाज अचानक माणुसकी विसरतो आणि एकमेकांच्या जीवावर उठायला तयार होतो? कारण काय भोंगे? इतका भरकटणारा आपला समाज आहे का? आपणाला बुद्धी नाही काय? तेव्हा एकमेकांच्या मदतीला सर्वजण धावायचे. हाच जातीपातीच्या पलिकडचा महाराष्ट्र धर्म आहे. यशवंतराव चव्हाणांनी महाराष्ट्राचा मंगल कलश जेव्हा आणला तेव्हा त्यांनी हा महाराष्ट्र मराठी माणसाचा आहे, असे सांगितले होते. म्हणून महाराष्ट्र ज्या विचाराने पुढे गेलाय, तो विचार फक्त समोर ठेवा. कोण कोणत्या पक्षाचा आहे, याचा विचार करु नका. आपल्या दरवाजात एखादा माणूस मदतीसाठी आला तर महाराष्ट्र धर्म पाळून त्याला मदत करा, अशा सूचनाही ना. डॉ. जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी कार्यकर्त्यांना केल्या.

हे सुध्दा वाचा :- 

Investigation over, case against Jitendra Awhad cannot be transferred to CBI, says Maharashtra govt

चिमुकल्यासाठी आमदार रोहित पवार ठरले देवदूत!

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी