30 C
Mumbai
Tuesday, April 23, 2024
Homeराजकीयपाथरवट कवितेच्या अनुषंगाने पवार साहेबांच्या विरोधात नाहक वाद निर्माण केला जातोय : ...

पाथरवट कवितेच्या अनुषंगाने पवार साहेबांच्या विरोधात नाहक वाद निर्माण केला जातोय :  जितेंद्र आव्हाड

टीम लय भारी 

मुंबई: जवाहर राठोड यांची पाथरवट ही कविता सध्या राज्यात गाजत आहे. शरद पवार यांनी जाहीर सभेत ही कविता वाचली होती. यावरुन शरद पवार यांच्यावर भाजपने टीका केली होती. भाजपने ट्विट करत असे म्हटले होते, नास्तिक शरद पवार यांनी हिंदू देवी देवतांचे बाप काढालेत. पवार नेहमीच हिंदू धर्माचा द्वेष करतात. पवारांनी हिंदूं धर्माची बदनामी केली नसती, जातीवाद केला नसता, देवीदेवतांचा अपमान केलाच नसता, तर ते एवढे मोठे झालेच नसते. jitendra awhad on jawahar rathod poem

पवार साहेब ह्या वयात आपल्याला शोभेल असेच वक्तव्य करा! यावर आता राष्ट्रवादीने प्रतिक्रीया दिली आहे. राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (jitendra awhad) यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे.आव्हाड म्हणतात की, जवाहर राठोड हे बंडखोर कवी त्यांची पाथरवट विद्रोही कविता आहे. या देशामध्ये विद्रोहाचा इतिहास हा 5000 वर्षे जुना आहे. इथली संत परंपरा ही विद्रोहाची कायम जाणीव करून देत असते. तुकाराम असो नाहीतर जनाबाई, नाहीतर आधुनिक काळातील नामदेव ढसाळ ह्यांनी कायम व्यवस्थेविरोधात उभे राहण्याचे काम केले.

फुले शाहू आंबेडकर हे विद्रोही होते परिवर्तन वादि होते विद्रोह म्हणजे समाजव्यवस्थेविरुद्ध मांडलेलं मतं. आणि समाजाने मोठ्या मनाने स्वीकारायचं देखिल असतं. कारण ह्या व्यवस्थेचा ज्यांना त्रास झालेला आहे ते आपलं मतं व्यक्त करत असतात. ज्यांना ह्या त्रासाची जाणीव असते ते परिवर्तनाच्या बाजूने उभे राहतात.समाजव्यवस्था सुधारविण्यासाठी ह्याची गरज आहे.आदरणीय श्री. शरद पवार साहेबांवरती टिका करणाऱ्यांनी ह्याची जाण ठेवावी असं मत मंत्री जितेंद्र आव्हाड (jitendra awhad) यांनी व्यक्त केले आहे.

या कवितेने भाजप आणि राष्ट्रवादीत जोरदार शाब्दिक चकमक पाहायला मिळतं आहे. पवारांनी देखील भाजपच्या टीकेला उत्तर दिलं. “टीकेला आम्ही घाबरत नाही. ज्यांना टीका करायची असेल त्यांनी खुशाल करा, पण जवाहर राठोड यांची कविता म्हणजे कष्टकऱ्यांच्या व्यथा आहे, आम्ही देव घडवले आणि आम्हालाच तुम्ही आडवताय या कष्टकऱ्यांच्या वेदना आहेत”, असं पवार म्हणाले आहे. jitendra awhad on jawahar rathod poem

तुमचा देव ब्रह्म, विष्णू, महेश, सरस्वती… यांना आम्ही रुपडं दिलं
आता तुम्ही खरं सांगा, ब्रह्मदेव आमचा निर्माता की आम्ही ब्रह्मदेवाचे पिता??
आमच्या छन्नी आणि हातोड्यासाठी कार्ल मार्क्ससारखा आधुनिक योद्धा
आमच्याजवळ इंद्राचं सोंग घेऊन आला…!

लेखक लक्ष्मण माने यांनी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात कष्टकऱ्यांच्या व्यथा सांगताना शरद पवार यांनी कवी  जवाहर राठोड यांची कविता वाचून दाखवली.

हे सुद्धा वाचा: 

कोरोनाच्या पाश्वभूमी रेल्वे प्रशासनाची नवीन नियमावली, मास्कचा वापर अनिवार्य

Sharad Pawar Says Common Pakistani Is Not India’s Enemy

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी