28 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
Homeमुंबईघरगुती गॅस चे वाढलेले दर भोंग्यां वरून जाहीर करा : जितेंद्र आव्हाड

घरगुती गॅस चे वाढलेले दर भोंग्यां वरून जाहीर करा : जितेंद्र आव्हाड

टीम लय भारी

मुंबई : पेट्रोल, डिझेलच्या वाढत्या दरामुळे नागरिक मेटाकुटीला आला आहे. आता त्यात गॅस दरवाढीची ठिणगी पडली आहे. त्यामुळे महागाईचा आगडोंब उसळला आहे. यावरून आता तीव्र पडसाद उमटण्याची शक्यता आहे. राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad)  यांनी गॅस दरवाढीवरून टीका करताना आता गॅसचे वाढलेले दर भोंग्यांवरून जाहीर करा, असा खोचक सल्ला त्यांनी केंद्र सरकारला दिला आहे. (Jitendra Awhad Said Announce the increased rates)

घरगुती गॅस सिलिंडर पुन्हा एकदा महागल्याने सर्वसामान्यांच्या माहिन्याचे बजेट विस्कळीत आहे. देशातभरात पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे आधीच जनतेच्या नाकीनऊ आले आहे. सिलिंडरच्या दरात ही वाढ झाली आहे. एलपीजीच्या दरवाढीमुळे भारतातील सर्वसामान्यांच्या (Jitendra Awhad) त्रासात भर पडणार आहे.

१४.२ किलो वजनाच्या घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत ५० रुपयांनी वाढ झाली आहे. यामुळे आजपासून घरगुती सिलिंडरची किंमत ९९९.५० रुपये झाली आहे. यावर प्रतिक्रिया देताना आव्हाड यांनी ट्विट करत घरगुती गॅसचा भाव परत वाढला, गॅसचे वाढलेले दर भोंग्यांवरून जाहीर करा, असे (Jitendra Awhad) म्हटले आहे.

यापूर्वी व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात २५० रुपयांनी वाढ करण्यात आली होती. त्यानंतर १ एप्रिलपासून व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमती २,२५३ रुपये करण्यात आल्या. त्याच वेळी, १ मार्च रोजी, व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात पुन्हा १०५ रुपयांनी वाढ करण्यात आली. देशातील सर्वसामान्य जनता सध्या पेट्रोल आणि डिझेलच्या वाढलेल्या (Jitendra Awhad)  किमतींमुळे हैराण झाली आहे. दरम्यान, एलपीजी गॅस सिलिंडरची महागाई त्यांना आणखी त्रासदायक ठरणार आहे.

हे सुध्दा वाचा :- 

Petrol and diesel prices decrease in Bhubaneswar, Check today’s rates in your city

देशातील सध्याच्या राजवटीच्या तुलनेत ब्रिटीश राजवट अधिक चांगली होती : संजय राऊत

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी