30 C
Mumbai
Friday, April 19, 2024
Homeनोकरी'या' जिल्ह्यात घेण्यात येणार 'अग्निपथ' सैन्य भरती मेळावा

‘या’ जिल्ह्यात घेण्यात येणार ‘अग्निपथ’ सैन्य भरती मेळावा

टीम लय भारी

अग्निपथ सैन्य भरती : देशात आता अग्निपथ या योजनेअंतर्गत सैन्य भरती करण्यात येणार आहे. 17 वर्ष सहा महिने वय पूर्ण केलेले तरुण या योजनेअंतर्गत सैन्यात भरती होऊ शकतात. याच पार्श्वभूमीवर आता सैन्य भरती कार्यालय, नागपूर द्वारे भरती मुख्यालय क्षेत्र, पुणे यांच्या अंतर्गत महाराष्ट्रातील जिल्ह्यातील स्वयंसेवक पुरुष उमेदवारांसाठी भरती मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

महाराष्ट्रातील 10 जिल्ह्यांसाठी 17 सप्टेंबर 2022 ते 07 ऑक्टोबर 2022 पर्यंत नागपूर येथे अग्निपथ योजनेअंर्तगत सैन्य भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. आज दिनांक 5 जुलै 2022 पासून यासाठीच्या ऑनलाईन नोंदणीला सुरुवात करण्यात आली आहे. नागपूर, वर्धा, वाशीम, अमरावती, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, अकोला आणि यवतमाळ या 10 जिल्ह्यांसाठी या भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

अग्निवीरच्या भरती मेळाव्यासाठीची नाव नोंदणी सुरु करण्यात आली आहे. याबाबतची माहिती सैन्य भरती कार्यालय, नागपूर यांनी प्रकाशित केलेल्या अधिसूचनेत देण्यात आली आहे. या भरती मेळाव्यासाठी उमेदवारांना 3 ऑगस्ट पर्यंत ऑनलाईन नोंदणी करण्यात येणार आहे. http://joinindianarmy.nic.in या वेबसाइटवर उमेदवारांची ऑनलाइन नोंदणी अनिवार्य आहे आणि नोंदणीकृत उमेदवारांची प्रवेशपत्रे 10 ऑगस्ट 2022 ते 20 ऑगस्ट 2022 या कालावधीत त्यांच्या नोंदणीकृत ईमेलवर पाठवली जातील, अशी माहिती पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.

'या' जिल्ह्यात घेण्यात येणार 'अग्निपथ' सैन्य भरती मेळावा

हे सुद्धा वाचा :

बाळासाहेब थोरात म्हणजे लोभस राजहंस, अधिकाऱ्याने व्यक्त केल्या भावना

फडणवीस आणि शहा यांच्यात नेमकं बिनसलंय काय ?

कोल्हापूरकरांना जिल्हा प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी