28 C
Mumbai
Thursday, March 28, 2024
HomeनोकरीESIC मध्ये भरती होण्याची सुवर्णसंधी

ESIC मध्ये भरती होण्याची सुवर्णसंधी

टीम लय भारी

मुंबई : कर्मचारी राज्य विमा महामंडळ अर्थात ESIC कडून प्राध्यापक या पदासाठी भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही सुवर्णसंधी चालून आली आहे. या भरती प्रक्रियेअंतर्गत एकूण 491 पदांची भरती करण्यात येणार आहे. कर्मचारी राज्य विमा महामंडळाकडून इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून यासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.

या पदासाठी इच्छुक आणि पात्र असलेले उमेदवार http://esic.nic.in या साईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात. या पदासाठी 18 जुलै 2022 पर्यंत उमेदवार आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरू शकतात. या भरती प्रक्रियेमध्ये इतर सर्व श्रेणीमधील पात्र उमेदवारांना अर्ज करण्यासाठी 500 रु. शुल्क आकारण्यात येणार आहे. तर, SC, ST आणि PWD विभागीय उमेदवार, महिला उमेदवार तसेच माजी सैनिक यांना अर्ज शुल्क भरण्यासापासून सूट देण्यात आली आहे.

या भरती प्रक्रियेमध्ये ओबीसी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी 126 पदे, प्रवर्गासाठी 45 पदे, एसटी प्रवर्गासाठी 41 पदे, अनुसूचित जाती वर्गासाठी 82 पदे आणि सर्वसाधारण वर्गासाठी सर्वाधिक 197 पदांची भरती करण्यात येणार आहे. महत्वाची बाब म्हणजे या पदासाठी निवड होणाऱ्या उमेदवारांना वेतन मॅट्रिक्स स्तर 11 अंतर्गत 67 हजार 700 रु. ते 2 लाख 8 हजार 700 इतके प्रति महिना वेतन कर्मचारी राज्य विमा महामंडळाकडून देण्यात येणार आहे.

अंतिम उमेदवाराची निवड मंडळाद्वारे घेतलेल्या मुलाखतीच्या आधारे केली जाईल. अंतिम मुलाखतीचे ठिकाण कर्मचारी राज्य विमा महामंडाकडून सांगण्यात येईल. तसेच इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपला भरलेला अर्ज प्रादेशिक संचालक, ESI कॉर्पोरेशन, पंचदीप भवन, सेक्टर-16 (लक्ष्मी नारायण मंदिराजवळ), फरिदाबाद – 121 002, हरियाणा येथे शेवटच्या तारखेपूर्वी पाठवावा.

हे सुद्धा वाचा :

रयत शिक्षण संस्थेत भरती; त्वरित अर्ज करा

लोकसेवा आयोगाच्या उत्तर तालिकांवरील हरकतीसाठी द्यावे लागणार शुल्क

यंदा आयटीआय प्रवेशासाठी दीड लाख जागा उपलब्ध

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी