30 C
Mumbai
Thursday, April 18, 2024
Homeनोकरीमुंबई महानगरपालिकेतील सार्वजनिक आरोग्य विभागात भरती सुरु

मुंबई महानगरपालिकेतील सार्वजनिक आरोग्य विभागात भरती सुरु

टीम लय भारी

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागातील रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. याबाबतची माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेने प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात ही भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. गृहस्थ (औषध) Houseman (Medicine) या पदासाठी ही भरती करण्यात येणार आहे. इच्छुक आणि पात्र असलेल्या उमेदवारांनी ऑफलाईन अर्ज करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

एकूण ९ रिक्त जागांसाठी ही भरती करण्यात येणार आहे. सदर पदासाठीचे ऑफलाईन अर्ज कस्तुरबा रुग्णालयात दि. १५ जुलै २०२२ पर्यंत सकाळी ११.३० ते ०४.०० या वेळेत देण्यात येतील. हे ऑफलाईन अर्ज दि. २२ जुलै २०२२ पर्यंत ११.३० ते ०४.०० या वेळेत स्वीकारण्यात येतील. बॅचलर ऑफ मेडिसिन आणि बॅचलर ऑफ सर्जरी (एम.बी.बी.एस) शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतात.

या भरती संदर्भातील सर्व माहिती https://drive.google.com/file/d/1ILxoyxhzvzBLDLE3XaTTgz5H8RhVh_QZ/view या पीडीएफ फाईलमध्ये देण्यात आली आहे. वैद्यकीय अधीक्षक कार्यालय, कस्तुरबा रुग्णालय, साने गुरुजी मार्ग, मुंबई – ११ या पत्त्यावर पात्र आणि इच्छुक उमेदवार आपला अर्ज पाठवू शकतात.

हे सुद्धा वाचा :

अबब ! IAS अधिकाऱ्याचा बेफिकीरपणा, ४ लाख गोरगरीब विद्यार्थ्यांचे अडवले ६३६ कोटी !

शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, मुंबई येथे भरती सुरु

शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, मुंबई येथे भरती सुरु

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी