33 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
Homeनोकरीसंसदेत नोकरी करण्याची सुवर्ण संधी; पार्लमेंट ऑफ इंडिया भरती २०२३ अंतर्गत संसदीय...

संसदेत नोकरी करण्याची सुवर्ण संधी; पार्लमेंट ऑफ इंडिया भरती २०२३ अंतर्गत संसदीय दुभाषी पदासाठी १३ जागांची भरती

जर तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल, तर तुम्हाला सुवर्ण संधी आहे. संसदेत दुभाष्याच्या १३ जागा रिक्त असून त्या भरण्यासाठी सरकारने नोकरभरतीची जाहिरात काढली आहे. सरकारने पात्र उमेदवारांना अर्ज करण्याचे आवाहन केले आहे. या नोकरभरतीव्दारे दुभाषी पदाच्या जागा भरण्यात येणार आहेत. (Recruitment of 13 vacancies for the post of Parliamentary Interpreter under Parliament of India Recruitment 2023)

पार्लमेंट ऑफ इंडिया भरती २०२३ अंतर्गत संसदीय दुभाषी पदासाठी १३ जागा भरण्यात येणार आहेत. यामध्ये ८ इंग्रजी आणि हिंदी दुभाष्यासाठी जागा आहेत. तर डोंगरी, काश्मिरी, कोकणी, संथाली आणि सिंधी प्रादेशिक भाषा दुभाष्यांसाठी ५ जागा आहेत. या पदासाठी अर्ज करण्यासाठी या https://pvp.nic.in/Interpreter/ लिंकला भेट देण्याचे आवाहन सरकारने केले आहे. उमेदवारांना अर्ज करण्याची तारीख – ७ मार्च २०२३ ते ३ एप्रिल २०२३ दरम्यान असून या तारखांच्या दरम्यान इच्छुक उमेदवारांनी अर्ज करावयाचे आहेत.

आरक्षण
या एकुण १३ रिक्त जागांपैकी दोन जागा एससी (SC) कॅटेगरी, ४ जागा ओबीसी (OBC) कॅटेगरी, ६ जागा युआर (UR) कॅटेगरी आणि एक जागा इडब्ल्यूएस (EWS) कॅटेगरीसाठी राखीव आहे.

शैक्षणिक पात्रता
इंग्रजी/हिंदी दुभाषीसाठी –

मास्टर्स डिग्री अनिवार्य/वैकल्पिक विषय म्हणून हिंदीसह इंग्रजीमध्ये पदव्युत्तर पदवी किंवा हिंदीमध्ये पदव्युत्तर पदवी पदवी स्तरावर असणे आवश्यक.
प्रादेशिक भाषा दुभाषीसाठी –
संबंधित प्रादेशिक भाषांसह इंग्रजी किंवा इतर कोणत्याही विषयात पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा
या पदासाठीची कमाल वयोमर्यादा ३५ वर्षे आहे.
उमेदवारांनी अधिक माहितीसाठी संसदेच्या https://loksabha.nic.in/ या अधिकृत बेवसाईट भेट द्यावी.

निवड
या रिक्त जारांगासाठी लेखी आणि मौखिक चाचणी तसेच वैयक्तिक मुलाखत घेण्यात येणार आहे. मौखिक चाचणी २०० गुणांची असणार आहे. तर लेखी चाचणी १०० गुणांची असणार आहे. तर वैयक्तिक मुलाखत ५० गुणांची असणार आहे.

येथे होणार परीक्षा
इंग्रजी आणि हिंदी दुभाष्याच्या पदांसाठी दिल्ली येथे परीक्षा होणार आहे. डोगरी दुभाष्यासाठी श्रीनगर येथे, कोंकणी दुभाष्यासाठी पणजी येथे, संथाली दुभाष्यासाठी रांची, सिंधी दुभाष्यासाठी अहमदाबाद, गांधीनगर किंवा मुंबई येथे परीक्षा होणार आहे.

हे सुद्धा वाचा
सत्ताधारी आमदार, खासदारांच्या घरासमोर फेकणार कांदा; स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक

भारत मॅट्रिमोनिअलविरोधात सोशल मीडियावर बॉयक़ॉटचा ट्रेंड; वाचा काय आहे कारण

त्यात काय एवढे, सामान्यांच्या घरीही ४-५ कोटी सापडतात, भाजप आमदार विरुपक्षप्पांचे निर्लज्ज विधान

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी