30 C
Mumbai
Wednesday, May 10, 2023
घरनोकरीUPSC: नोकरदारांना खास संधी..! 577 जागांसाठी नोकरभरती; आजच अर्ज करा

UPSC: नोकरदारांना खास संधी..! 577 जागांसाठी नोकरभरती; आजच अर्ज करा

भारतामधील अनेक तरुण सरकारी नोकरीच्या शोधात असतात. आपल्याला सरकारी नोकरी मिळाली तर बरं होईल असं अनेकांचं म्हणणं असतं. केवळ तरुणच नाही तर त्यांच्या पालकांनाही आपल्या मुलाला किंवा मुलीला सरकारी नोकरी मिळाली तर त्याचं फार भलं होईल असं वाटतं. दर वर्षी कोट्यवधी उमेदवार सरकारी नोकऱ्यांसाठी घेतल्या जाणाऱ्या प्रवेश परीक्षा देतात. अनेक तरुण तर आयुष्यातील उमेदीची ५ ते १० वर्ष सरकारी नोकरी मिळवण्यासाठीची तयारी, अभ्यास आणि नोकरी शोधण्यातच घालवतात. अशाच सरकारी नोकरीच्या प्रतिक्षेमध्ये असलेल्यांना आता यूपीएससी (UPSC) कडून दिलासादायक बातमी समोर आली आहे.

संघ लोकसेवा आयोगाकडून एकूण 577 जागांसाठी नोकरभरती जाहीर करण्यात आली आहे. केंद्रीय श्रम मंत्रालयात (Ministry of Labour and Employment‌‌‌), कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (Employees’ Provident Fund Organisation) मध्ये नोकरीची संधी आहे. यामध्ये 418 जागा या Enforcement Officer/Accounts Officer या पदासाठी आहेत तर 159 जागा Assistant Provident Fund Commissioner या पदासाठी असणार आहेत. यासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 17 मार्च असणार आहे. upsc.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर उमेदवार आपला अर्ज दाखल करू शकतात.

त्याचप्रमाणे अंमलबजावणी अधिकारी/लेखा अधिकारी (Enforcement Officer/Accounts Officer) या पदासाठी कमाल वयोमर्यादा 30 वर्ष आहेत. तर सहाय्यक भविष्य निर्वाह निधी आयुक्त (Assistant Provident Fund Commissioner) साठी 35 वर्षांची वयोमर्यादा आहे. SC/STप्रवर्गातील उमेदवारांना 5 वर्षांपर्यंत तर OBC प्रवर्गासाठी 3 वर्षांपर्यंत सूट मिळणार आहे.

या पदासाठी अर्ज करणार्‍यांकडे कोणत्याही शाखेतील पदवी आवश्यक आहे. तर अर्ज करण्यासाठी 25 रूपये शुल्क आकारले जाईल. महिला, एसी, एसटी, दिव्यांग यांच्यासाठी हे शुल्क माफ केले जाणार आहे. दोन्ही पदांसाठी अर्ज करणार्‍यांकडून 50 रूपये घेतले जातील. दरम्यान जाहीर केलेल्या मार्गदर्शक सुचनेनुसार, उमेदवाराची निवड झाल्यास त्याला भारतामध्ये कोठेही नियुक्ती घ्यावी लागेल आणि त्याचा उमेदवारीचा काळ 2 वर्ष आहे.

उमेदवारांची निवड करण्यासाठी लेखी परीक्षा घेतली जाईल. त्याचप्रमाणे शॉर्ट लिस्ट झालेल्यांच्या मुलाखती होतील. निवड झालेल्या उमेदवारांना त्यांची कागदपत्रं सादर करावी लागणार आहेत. कागदपत्रांची छाननी झाल्यानंतर पात्र उमेदवारांनाच मुलाखतीसाठी बोलावलं जाणार, अशी माहिती आयोगाच्यावतीने देण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा : 

CISF मध्ये निघाली बंपर भरती, आजच अर्ज करा..!

एमपीएससीच्या तांत्रिक घोळामुळे उच्च पत्रकारिता पदवीधर अर्जाला मुकले; पुन्हा जाहिरात प्रसिद्ध करण्याची मागणी

महाराष्ट्र बोर्डाच्या अभ्यासक्रमाकडे पालकांची पाठ ; महापालिकेच्या ‘सीबीएससी’, ‘आयसीएससी’च्या ८६८ जागांसाठी चार हजारपेक्षा अधिक अर्ज

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी