राजकीयमहाराष्ट्र

फडणवीस सरकारने केलेल्या त्या पापाची फळे आजही धनगर समाज भोगत आहे : किशोर मासाळ

धनगर समाजाच्या महामंडळाच्या निधीवरून भाजप नेते राजकारण करु पाहत आहेत. फडणवीस सरकारने जे पाप धनगर समाजाच्या बाबतीत केले आहे. त्या पापाची फळे आजही समाज भोगत आहे, असा घणाघात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष किशोर मासाळ (Kishore Masal) यांनी केला आहे. (

टीम लय भारी

मुंबई : धनगर समाजाच्या महामंडळाच्या निधीवरून भाजप नेते राजकारण करु पाहत आहेत. फडणवीस सरकारने जे पाप धनगर समाजाच्या बाबतीत केले आहे. त्या पापाची फळे आजही समाज भोगत आहे, असा घणाघात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष किशोर मासाळ (Kishore Masal) यांनी केला आहे. (Kishore Masal criticizes Devendra Fadnavis)

फडणवीस सरकारने केलेल्या त्या पापाची फळे आजही धनगर समाज भोगत आहे : किशोर मासाळ

२०१४ च्या पहिल्याच कॅबिनेट बैठकीत तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पेनची रिफिल संपली नसती तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पेनमधील शाईची गरजच भासली नसती, अशी टीका किशोर मासाळ यांनी केली आहे.

मासाळ म्हणाले की, धनगर समाजाच्या इतिहासात जर सगळ्यात मोठी फसवणूक समाजाची कधी झाली तर ती २०१४ मध्ये झाली, हे विसरता कामा नये. धनगर समाजाच्या महामंडळाच्या निधीवरून जे राजकारण करू पाहत आहेत. त्यांनी हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे.महामंडळाला १०० कोटी निधी मंजूर झाला आहे, हा निधी जरी कमी असला तरी तो उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच दिला आहे. भविष्यात मोठा निधी महामंडळाला जमा होणार आहे. पण फडणवीस सरकारने जे पाप धनगर समाजाच्या बाबतीत केले आहे. त्या पापाची फळे आजही समाज भोगत आहे. हे विसरता कामा नये.

लाखो जनसमुदायासमोर पहिल्या कॅबिनेटचा शब्द कोणी दिला आहे. हे संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे. तसेच तो शब्द कसा दिला हे धनगर समाजाला माहित आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फक्त सत्तेत बसण्यासाठीच दिला होता, यावर समाजातील दक्ष तरुणांनी विचार करणे गरजेचे आहे, असं म्हणत भाजप पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर केलेल्या टीकेचा खरपूस समाचार मासाळ यांनी यावेळी घेतला.


हे सुद्धा वाचा :

अनिल परबांच्या घरी ईडीची छापेमारी,आता भाजप नेत्यांना टिकेसाठी खुले मैदान

भाजपने आपल्या पक्षाच्या घटनेतून ‘धर्मनिरपेक्षता’ शब्द काढून ‘जातीयवाद’ जोडावा : सचिन सावंत

भाजपाने भोंगा वाजवताच मुंबई पालिका प्रशासनाला जाग, वरिष्ठ अधिकारी नालेसफाईसाठी रस्त्यावर : आशिष शेलार

ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी भाजपने मंत्रालयावर काढलेला मोर्चा म्हणजे निव्वळ ढोंग : नाना पटोले

Tags

आणखी वाचा

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close