महाराष्ट्र

नवनीत राणा या स्पॅाडिलॅसिसच्या रूग्ण नाही तर मनोरुग्ण : किशोरी पेडणेकर

अपक्ष आमदार रवी राणा, खासदार नवनीत राणा आणि शिवसैनिकांमध्ये मागील काही दिवसांपासून राजकीय कलगीतुरा रंगाताना दिसत आहे.  मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी खासदार नवनीत राणा यांच्यावर जहरी टीका केली. नवनीत राणा सी ग्रेड पब्लिसिटी च्या नादात काहीही बरळतात आहेत. नवनीत राणा या रुग्ण नाहीत तर मनोरुग्ण झाल्या आहेत असं म्हणत पेडणेकर यांनी राणांवर निशाणा साधला आहे.

टीम लय भारी 

नवनीत राणा या स्पॅाडिलॅसिसच्या रूग्ण नाही तर मनोरुग्ण : किशोरी पेडणेकर

मुंबई : अपक्ष आमदार रवी राणा, खासदार नवनीत राणा आणि शिवसैनिकांमध्ये मागील काही दिवसांपासून राजकीय कलगीतुरा रंगाताना दिसत आहे.  मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर (kishori pednekar) यांनी खासदार नवनीत राणा यांच्यावर जहरी टीका केली. नवनीत राणा सी ग्रेड पब्लिसिटी च्या नादात काहीही बरळतात आहेत. नवनीत राणा या रुग्ण नाहीत तर मनोरुग्ण झाल्या आहेत असं म्हणत पेडणेकर यांनी राणांवर निशाणा साधला आहे.

राणा दाम्पत्यांनी दिल्लीत गाठली, त्यांनी भाजप नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्यानंतर पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली. त्यांच्या टीकेला उत्तर देताना किशोरी पेडणेकर (kishori pednekar) यांनी जोरदार पलटवार केला आहे. याआधीही शिवसेनेने लीलावती रुग्णालयात जाऊन राणांच्या उपचारा संदर्भात पोलखोल केली होती.

संविधानिक पदावर असलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर त्या बोलतात ते योग्य नाही. त्यांनी आपल्या दोन्ही मुलांना राजकारणात ओढलं. त्यांना स्क्रिप्ट लिहून दिली होती. आई बाप म्हणून भान असावे जरा जबाबदारीने वागा, असा सल्लाही पेडणेकर यांनी दिला आहे.

हे सुद्धा वाचा: 

संजय राऊतांकडून ‘किरीट का कमाल’ म्हणत सोमय्यांवर गंभीर आरोप

How Videos Can Be Shot in MRI Room? Asks Shiv Sena as it Seeks to Corner Navneet Rana

Tags

आणखी वाचा

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close