34 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्रहेरवाडमध्ये विधवा प्रथा बंद गावसभेत ठराव!

हेरवाडमध्ये विधवा प्रथा बंद गावसभेत ठराव!

टीम लय भारी 

कोल्हापूर : पतीच्या निधनानंतर महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र काढणे, कुंकू पुसणे, बांगड्या फोडल्या जातात मात्र या विधवा प्रथा (‘widow rituals’) बंद करण्याचा महत्त्वपूर्ण ठराव हेरवाड (ता. शिरोळ) येथील गावसभेत केला. अध्यक्षस्थानी सरपंच सुरगोंडा पाटील होते असा ठराव करणारी हेरवाड जिल्ह्यातील पहिलीच ग्रामपंचायत ठरली आहे. विधवांना सन्मानाने समाजात जगता यावे यासाठी विधवा प्रथा बंद करण्यात आली आहे. छत्रपती शाहू महारांजाच्या कोल्हापूर भूमितून या निर्णयाची सुरुवात होतं आहे. Kolhapur village bans ‘widow rituals’

समाज परिवर्तनाच्या दिशेने एक पाऊल  म्हणून या निर्णयाकडे पाहाण्यात येत आहे. महिलांना समानतेची वागणू मिळण्यासाठी या अशा प्रथा(‘widow rituals’) बंद करणे गरजेचे आहे. सौ. मुक्ताबाई संजय पुजारी ठरावाच्या सूचक असून अनुमोदन सुजाता केशव गुरव यांनी दिले आहे. महिलांना सन्मानाने जगण्याचा त्यांनाही हक्क आहे; मात्र महिला विधवा झाल्याक्षणीच तिचे समानतेचे मूलभूत हक्क हिरावून घेतले जातात व आयुष्यभर तिच्यावर अन्याय होतो.

 ग्रामसभेत सर्वानुमते विधवा प्रथेला विरोध करण्यात आला होता. ग्रामसभेत सूचक आणि अनुमोदक महिला राहिल्या. आता ही प्रथा या गावातून हद्दपार झाली आहे. त्यामुळे या गावाचा आदर्श अन्य गावे घेतील, असा हा ऐतिहासिक निर्णय आहे. या निर्णयाचे आणि गावाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

हे सुध्दा वाचा: 

राजकीय द्वेषापोटी फोन टॅपिंग; खरा सुत्रधार कोण हे उघड व्हावे : नाना पटोले

A tribute to Shahu Maharaj: Kolhapur village bans ‘widow rituals’

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी