32 C
Mumbai
Thursday, March 28, 2024
Homeमहाराष्ट्रराजापूरमधील बारसू-सोलगाव पंचक्रोशीमध्ये जमीन खरेदीवरून शिवसेना मंत्र्याचा काळा बाजार

राजापूरमधील बारसू-सोलगाव पंचक्रोशीमध्ये जमीन खरेदीवरून शिवसेना मंत्र्याचा काळा बाजार

टीम लय भारी

राजापूर : रिफायनरी प्रकल्पावरून (Konkan refinery project) सध्या कोकणात अनेक घडामोडी घडत आहेत. राजापूर येथील धोपेश्वर भागात रिफायनरी विरोधात ठराव झाल्यानंतर आता रिफायनरीचं भवितव्य काय? याची चर्चा सुरु होती. परंतू सध्या रिफानरीसाठी चर्चेत असलेल्या कोकणातील राजापूर तालुक्यात गेल्या काही महिन्यातच बारसू, सोळगाव, देवाचेगोठणे पंचक्रोशीत हजारो एकर जमिनी खरेदी-विक्री व्यवहार मोठ्या प्रमाणात चालू असल्याचा घोटाळा उघकीस आला आहे. (Konkan refinery project Shiv Sena minister’s scam)

बारसू-सोलगाव आणि पंचक्रोशीमध्ये हजारो एकर जमिनीची खरेदी जानेवारी २०२२ ते मार्च २०२२ या कालावधीत झाल्याची बाब आता समोर आली आहे. सदर परिसरात जमिनी खरेदी करण्यात प्रामुख्याने महाराष्ट्र सरकार मधील शिवसेनेचे दोन मंत्री व त्यानीच (Konkan refinery project) परप्रांतीयांना पुढे करून कवडीमोलाने जमिनी घ्याण्यास भाग पाडले आहेत.

एका मंत्र्याच्या भावाने व दुसऱ्या मंत्र्यांच्या मुलाने हे जमीन घोटाळ्याचे (Konkan refinery project) उद्योग करत येथील गरीब शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक केली आहे. ही जमीन खरेदी करत असताना, आमदाराला हाताशी धरून या दोन मंत्र्यांनी हे उद्योग केल्याचे उघड झाले आहे.

या मुद्यावर भाष्य करताना कोकण शक्ती महासंघाचे अध्यक्ष अशोक वालम म्हणाले, गेल्या महिन्याभरापासून आम्ही मुख्यमंत्र्यांना विविध संघटनांच्या माध्यमातून या जमीन घोटाळ्यांची (Konkan refinery project) व या दोन मंत्र्यांची चौकशी करावी, असे पत्र दिले असतानाही त्याचं काहीही प्रत्युत्तर आम्हाला मिळालेले नाही. म्हणून आता आम्ही काही दिवसातच ईडी कार्यालयात सदर मंत्री व तेथील जमीन खरेदी- घोटाळ्यांची सगळी प्रकरण नेऊन देणार आहोत. आणि जोपर्यंत या जमीन खरेदी घोटाळ्यांची चौकशी करून संबंधित लोकांवर कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही.

भाजप सरकारने ला नाणार परिसरात ऑइल रिफायनरी पेट्रोकेमिकल (Konkan refinery project) सारखा महा प्रदूषणकारी प्रकल्प प्रस्तावित करून कोकणी जनतेच्या समोरून वार केला होता परंतू, शिवसेनेने व खास करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यावेळेला आमच्या आंदोलनाला पाठिंबा देत रिफायनरीला विरोध करत आम्हा शेतकऱ्यांसोबत राहून आता मात्र आमच्याच पाठीत खंजीर खुपसला आहे. एका बाजूने शेतकऱ्यांची दया-माया दाखवायची आणि दुसऱ्या बाजूने आपल्याच मंत्र्यांचे जमिनीचे लाड पुरवण्यासाठी शेतकऱ्यांनाच भूमिहीन करत नष्ट करायचे हे मुख्यमंत्री महोदय बरे नव्हे. असेही कोकण शक्ती महासंघाचे अध्यक्ष अशोक वालम म्हणाले.

हे सुध्दा वाचा :- 

Maharashtra: After Seven Years, Question of Relocating Nanar Oil Refinery Project Still On

नवनीत राणा यांनी लकडावालाकडून ८० लाख घेतले याचा तपास ईडीने करावा : छगन भुजबळ

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी