30 C
Mumbai
Wednesday, April 17, 2024
Homeराजकीयलक्ष्मण जगताप, मुक्ता टिळक, शंकरराव गडाख यांना पुन्हा ‘जीव मुठीत घेऊन’ पवित्र...

लक्ष्मण जगताप, मुक्ता टिळक, शंकरराव गडाख यांना पुन्हा ‘जीव मुठीत घेऊन’ पवित्र सभागृहात यावे लागणार…

टीम लय भारी

मुंबई : लोकशाहीचे पवित्र मंदीर अशी विधीमंडळांच्या दोन्ही सभागृहांची ओळख आहे. तरीही केवळ राजकीय स्वार्थ आणि घोडेबाजार यामुळे तीन आजारी आमदारांना गेल्या महिन्यांत दोन वेळा सभागृहात यावे लागले. दरम्यान,  सत्तांतराच्या अभुतपूर्व घडामोडींनंतर राज्यात आता ‘भाजप – बंडोबा’ युतीचे सरकार आले आहे. त्यामुळे या नव्या सरकारला सभागृहात बहुमत सिद्ध करण्यासाठी बोलावलेल्या अधिवेशनात पुन्हा या तीन आमदारांच्या आजारपणाची वरात निघणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

‘पक्षासाठी काहीही’ अशी भूमिका असणारे तीन भाजप आमदार लक्ष्मण जगताप, मुक्ता टिळक, शंकरराव गडाख यांनी अॅम्बूलन्स मधून विधान भवन गाठून दोनदा मतदानाचा हक्क बजावला होता. आजारपणामुळे तिघांची परिस्थिती अवघड असूनही पक्षासाठी त्यांनी आपले योगदान दिले, परंतु ही वरात दरवेळी काढून काही जणांकडून सहानुभूतीची भावना मिळत असली तरीही उगाचच आमदारांचा छळ करणाऱ्या भाजपवर रोष असणाऱ्यांची संख्या सुद्धा मोठीच पाहायला मिळत आहे.

दरम्यान, बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खुपसला. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांना टांग मारली, अन् स्वतःच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ घातली. खरंतर एकनाथ शिंदे यांच्याकडे स्वतःचे असे बंडोबांचे एक टोळके आहे. या  ‘भाजप – बंडोबा’ युतीच्या सरकारला सभागृहात बहुमत सिद्ध करावे लागणार आहे आणि यासाठी दोन दिवसीय अधिवेशन बोलविण्यात आले आहे.

मताधिक्य सिद्ध करण्यासाठी भाजपच्या आमदारांना एकनाथ शिंदे यांच्या पारड्यात मत टाकावेच लागणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय आणि राज्यापालांनी बहुमतासाठी दोन वेळा काढलेले आदेश या सगळ्या बाबी विचारात घेता शिंदे सहजपणे बहुमत सिद्ध करतील, हे स्पष्ट दिसत असले तरीही बहुमत सिद्धीसाठी भाजपच्या या तीन आमदारांना पुन्हा मुंबईमध्ये यावे लागणार आहे. सत्तेसाठीची तडफडणारा भाजप विधीमंडळाच्या पवित्र सभागृहात तिनही आमदारांना पुन्हा ‘जीव मुठीत घेऊन’ पवित्र सभागृहात यावे लागणार का असा सूर या निमित्ताने येऊ लागला आहे.

हे सुद्धा वाचा :

Exclusive : एकनाथ शिंदे गटाला मोठा फटका, तीन मंत्रीपदे कमी झाली

वाघाच्या ‘वाटेला जाणे’ पडले महागात, काही सेकंदातच खेळ खल्लास !

राजन साळवींच्या उमेदवारीने बंडखोरांची ‘लाज’ चव्हाट्यावर येणार !

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी