27 C
Mumbai
Thursday, March 28, 2024
Homeराष्ट्रीयमहाराष्ट्राचे सुपुत्र, लेफ्टनंट जनरल मनोज पांडेची, भारतीय लष्कर प्रमुख पदी नियुक्ती

महाराष्ट्राचे सुपुत्र, लेफ्टनंट जनरल मनोज पांडेची, भारतीय लष्कर प्रमुख पदी नियुक्ती

टिम लय भारी 

लेफ्टनंट जनरल मनोज पांडे (Lieutenant General Manoj Pandey) हे आता भारताचे पुढील लष्कर प्रमुख असणार आहेत. ते सध्या लेफ्टनंट जनरल मनोज पांडे हे लष्कराचे उपप्रमुख आहेत. जनरल एमएम नरवणे या महिन्याच्या अखेरीस निवृत्त होत आहेत. लेफ्टनंट जनरल मनोज पांडे (Lieutenant General Manoj Pandey) हे पहिले अभियंता असतील जे भारतीय लष्कराची कमान सांभाळतील.(Lieutenant General Manoj Pandey appointed Indian Army Chief)

मनोज पांडे (Lieutenant General Manoj Pandey) हे देशातील पहिले इंजिनिअर असतील, ज्यांच्याकडे लष्करप्रमुखाची कमान सोपवली जाईल. मनोज नरवणे यांच्यानंतर लेफ्टनंट जनरल मनोज पांडे हे लष्करातील सर्वात वरिष्ठ अधिकारी आहेत. जनरल एमएम नरवणे हे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ पदासाठीच्या स्पर्धेत आघाडीवर आहेत. लेफ्टनंट जनरल मनोज पांडे हे आधी इस्टन कमांडचे कमांडिंग ऑफिसर होते. त्यांनी अंदमान आणि निकोबार कमांडचे कमांडर-इन-चीफ पदही भूषवले आहे. लेफ्टनंट जनरल मनोज पांडे (Lieutenant General Manoj Pandey) यांनी परम विशिष्ट सेवा पदक, अति विशिष्ट सेवा पदक आणि विशिष्ट सेवा पदक मिळवलं आहे.

मनोज पांडे यांची लष्करी कारकीर्द

लेफ्टनंट जनरल मनोज पांडे (Lieutenant General Manoj Pandey) यांचा जन्म डॉ. सीजी पांडे आणि प्रेमा यांच्या घरी झाला, त्यांची आई ऑल इंडिया रेडिओच्या उद्घोषक होत्या. त्यांचे कुटुंब नागपूरचे आहे. शालेय शिक्षण झाल्यावर मनोज पांडे हे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत रुजू झाले. एनडीएनंतर, त्यांनी इंडियन मिलिटरी अकादमीमध्ये प्रवेश घेतला. 3 मे 1987 रोजी शासकीय दंत महाविद्यालयाच्या सुवर्णपदक विजेत्या अर्चना सालपेकर यांच्याशी त्यांचा विवाह झाला.

लडाख सेक्टरमधील माउंटन डिव्हिजन आणि ईशान्येकडील कॉर्प्सचे नेतृत्व केले आहे. ईस्टर्न कमांडचा पदभार स्वीकारण्यापूर्वी त्यांनी अंदमान आणि निकोबार कमांडच्या कमांडर-इन-चीफची जबाबदारी सांभाळली होती. गेल्या तीन महिन्यांत काही उच्चपदस्थ अधिकारी निवृत्त झाल्यानंतर पांडे हे संरक्षण क्षेत्रात सर्वात ज्येष्ठ अधिकारी बनले आहेत. आर्मी ट्रेनिंग कमांडचे प्रमुख असलेले लेफ्टनंट जनरल राज शुक्ला 31 मार्च रोजी निवृत्त झाले. अन्य काही ज्येष्ठ जानेवारीअखेर निवृत्त झाले (Lieutenant General Manoj Pandey) आहेत. लेफ्टनंट जनरल सीपी मोहंती आणि लेफ्टनंट जनरल वायके जोशी 31 जानेवारीला निवृत्त झाले.

हे सुद्धा वाचा :- 

Lieutenant General Manoj Pande is the new COAS. How is the Chief of Indian Army selected?

भाजप आमदार गणेश नाईक यांना अटक करा :  रुपाली चाकणकर

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी