30 C
Mumbai
Thursday, April 18, 2024
Homeमहाराष्ट्रLockdown4 : कोविड पॉजिटीव्ह रुग्णांना सहकार्य करा, हीन वागणूक देऊ नका; आरोग्यमंत्री...

Lockdown4 : कोविड पॉजिटीव्ह रुग्णांना सहकार्य करा, हीन वागणूक देऊ नका; आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे आवाहन

टीम लय भारी

मुंबई : संपूर्ण देशात लॉकडाउन 4 (Lockdown) सुरु आहे. राज्य सरकारने आज लॉकडाऊन 4 बाबत नियम बदलण्यात आल्याचे सांगितले. याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी फेसबुकवर (Facebook Live) संवाद साधताना दिली. दरम्यान, महाराष्ट्रात आज कोरोनाचे (Coronavirus) 2100 नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 37 हजार 158 वर पोहोचली आहे, असेही आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

यावेळी जनतेशी संवाद साधताना टोपे म्हणाले की, माणसाने माणसाशी माणसासारखे वागायला हवे. या कोरोनाच्या (Coronavirus) संकटकाळात सर्वांनी एकमेकांना मदत केली पाहिजे. विशेष करुन कोविड पॉजिटीव्ह रुग्णांना सहकार्य करा, हीन वागणूक देऊ नका, असे आवाहनही आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यातील जनतेला केले आहे.

https://www.facebook.com/RajeshTopeOfficial/videos/263857871664939/

राज्यातील लॉकडाऊन संदर्भातली नियमावली महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ठरविली आहे. ही नियमावली येत्या २२ मे पासून लागू होणार आहे. यानुसार महाराष्ट्रात आता दोनच झोन असणार असून ग्रीन आणि ऑरेंज झोन रद्द करण्यात आले आहेत. दोन्ही झोनमध्ये कन्टेनमेंट झोन असणार आहे. राज्यात आता २२ मेपासून रेड आणि नॉनरेड असे दोनच झोन अस्तित्वात असणार आहेत.

मुंबई महानगर प्रदेशासह पुणे, नाशिक, सोलापूर, मालेगाव, सोलापूर, जळगाव, अकोला, अमरावती, औरंगाबाद ही महापालिका क्षेत्र रेड झोन म्हणून जाहीर करण्यात आली आहेत. या महापालिकांव्यतिरिक्त राज्यातील उर्वरित भाग रेडझोन बाहेर असेल. कंटेनमेंट झोनमध्ये फक्त जीवनावश्यक गोष्टींना परवानगी देण्यात येईल.

राज्य शासनाची नवीन नियमावली

 

रेड झोनमध्ये काय सुरू राहणार

अत्यावश्‍यक सेवेची सर्व दुकाने, इतर दुकानांच्याबाबत स्थानिक प्रशासन निर्णय घेणार

स्थानिक प्रशासनाने परवानगी दिली तर दारूची दुकाने सुरू करता येणार, दारूची होम डिलिव्हरी करता येणार

टॅक्‍सी, रिक्षा सेवा बंद राहणार

चार चाकीमध्ये 1+ 2 आणि दुचाकीवर एकालाच परवानगी

मॉल्स, परवानगी नसलेली दुकाने, परवानगी नसलेली इतर आस्थापने साफसफाईसाठी सकाळी 9 ते संध्याकाळी 5 या वेळात सुरू ठेवू शकतात

विद्यापीठ, महाविद्यालयात उत्तरपत्रिका तपासणी, निकाल लावण्यासाठी 5 टक्के कर्मचारी उपस्थित ठेवण्यास परवानगी

नॉन रेड झोनमध्ये काय नियम

स्पोर्टस्‌ कॉम्प्लेक्‍स, स्टेडियम, खुल्या जागा वैयक्तिक व्यायामासाठी सुरू राहणार, पण सामुहिक जमावाला बंदी

आंतरजिल्हा बससेवा 50 टक्के प्रवासी क्षमतेने चालविण्यास परवानगी

सर्व दुकाने आणि बाजारपेठा सकाळी 9 ते संध्याकाळी 5 या वेळेत सुरू राहणार, मात्र गर्दी झाल्यास हे बंद करण्याचा निर्णय स्थानिक प्रशासन घेऊ शकते. बिगर रेड झोनमधील सलून सुरु करण्यास परवानगी

काय बंद राहणार

ट्रेन, मेट्रो, विमान सेवा सर्वच झोनमध्ये बंद राहणार.
आंतरराज्य रस्ते वाहतूक बंदच राहणार.
शैक्षणिक संस्था, हॉस्पिटल, हॉटेल, मॉल, प्रार्थनास्थळे, बंदच राहणार.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी