29 C
Mumbai
Saturday, April 20, 2024
Homeमहाराष्ट्रमाजी केंद्रीय गृहसचिव माधव गोडबोले यांचे वयाच्या ८५ व्या वर्षी पुण्यात निधन

माजी केंद्रीय गृहसचिव माधव गोडबोले यांचे वयाच्या ८५ व्या वर्षी पुण्यात निधन

टीम लय भारी

पुणे : भारताचे माजी केंद्रीय गृहसचिव डॉ. माधव गोडबोले (Madhav Godbole) यांचे सोमवारी पुण्यात हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. वयाच्या 85 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. खंबीर प्रशासकीय अधिकारी आणि लेखक म्हणून त्यांची ओळख होती. केंद्रीय गृहसचिव आणि न्याय विभागाचे सचिव म्हणून काम केल्यानंतर गोडबोले (Madhav Godbole) मार्च १९९३ मध्ये IAS मधून निवृत्त झाले. (Madhav Godbole dies at 85 in Pune)

त्यांनी केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू आणि शहरी विकास मंत्रालयांचे सचिव, महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाचे अध्यक्ष आणि राज्याचे मुख्य वित्त सचिव,आशियाई विकास बँक, मनिला येथे पाच वर्षांचा कार्यकाळ (Madhav Godbole) म्हणून काम केले. त्यांच्या सेवानिवृत्तीनंतर, गोडबोले सार्वजनिक धोरण आणि प्रशासनाच्या क्षेत्रात सक्रिय होते आणि द इंडियन एक्स्प्रेससह विविध वर्तमानपत्रांमध्ये अनेक लेख त्यांनी लिहिले.

माधव गोडबोले यांनी जवळपास २२ पुस्तके लिहिली. त्यातील अनेक पुस्तके ही इंग्रजी भाषेत आहेत. त्यातील काही पुस्तकांचे (Madhav Godbole) मराठीत अनुवाद झाला आहे. केंद्र सरकारची आंतरराष्ट्रीय सीमा व्यवस्थापन समिती आदी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या.

डॉ. माधव गोडबोले यांची कारकीर्द

माधव गोडबोले (Madhav Godbole) यांनी अमेरिकेतील विल्यम्स कॉलेजमधून विकासाचे अर्थशास्त्र या विषयात एम.ए. व पीएच्‌.डी. या पदव्या मिळवली. डॉ. माधव गोडबोले यांनी महाराष्ट्र सरकारमध्ये मुख्य आर्थिक सचिव म्हणून जबाबदारी पार पाडली होती. त्याशिवाय, महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाचे अध्यक्ष होते. त्यांनी मनिला येथील आशियाई विकास बँकेत पाच वर्षे काम केले.

हे सुद्धा वाचा :- 

Former Union home secretary Madhav Godbole passes away at 85

मुख्यमंत्र्याच्या गैरहजेरीत अदित्य ठाकरे करणार विमानतळावर मोदींच स्वागत

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी