29 C
Mumbai
Saturday, April 20, 2024
Homeमहाराष्ट्रराज्यात ६६ हजार रोजगार निर्माण होणार, जागतिक आर्थिक परिषदेत ३० हजार...

राज्यात ६६ हजार रोजगार निर्माण होणार, जागतिक आर्थिक परिषदेत ३० हजार कोटींचे करार

टीम लय भारी

दावोस, स्वित्झर्लंड : राज्याच्या अर्थव्यवस्थेची क्षमता बळकट करण्यासाठी व व्यवसाय सुलभतेसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मॅग्नेटिक महाराष्ट्र (Magnetic Maharashtra) २.० या उपक्रमाची संकल्पना मांडण्यात आली. जागतिक आर्थिक परिषद २०२२ च्या वार्षिक बैठकीत दुसऱ्या दिवशी विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यांशी २३ सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. दावोस येथील महाराष्ट्र लाउंजमध्ये झालेल्या सामंजस्य करारात एकूण रु. ३०,३७९ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. या गुंतवणूकीमुळे सुमारे ६६ हजार रोजगार निर्माण होणार आहेत. (Magnetic Maharashtra 2.0 was introduced under the leadership of Chief Minister Uddhav Thackeray)

राज्यात ६६ हजार रोजगार निर्माण होणार, जागतिक आर्थिक परिषदेत ३० हजार कोटींचे करार

मॅग्नेटिक महाराष्ट्र २.० (Magnetic Maharashtra) उपक्रमांतर्गत दहाव्या आवृत्तीत आज झालेल्या गुंतवणूकीत ५५ टक्क्यांहून अधिक गुंतवणूक ही सिंगापूर, इंडोनेशिया, अमेरिका आणि जपान सारख्या देशांकडून थेट परकीय गुंतवणूकीच्या स्वरुपात आकर्षित करण्यात महाराष्ट्र यशस्वी ठरला आहे. या उपक्रमाअंतर्गत एकूण १० आवृत्या आयोजित करण्यात आल्या, त्यामाध्यमातून आजतगायत १२१ सामंजस्य करार झाले, त्यातून राज्यात एकूण २.१५ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक प्राप्त झाली आहे, त्यात सुमारे ४ लाख रोजगार निर्मितीची क्षमता आहे.गतिक आर्थिक परिषद २०२२ च्या वार्षिक बैठकीत दुसऱ्या दिवशी विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यांशी २३ सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. यात प्रामुख्याने औषध निर्माण, वस्त्रोद्योग, अभियांत्रिकी,पॅकेजिंग, पेपर पल्प व अन्न प्रक्रिया, स्टिल, माहिती तंत्रज्ञान, डेटा सेंटर, लॉजिस्टिक इ. क्षेत्रांचा समावेश आहे.

राज्यात ६६ हजार रोजगार निर्माण होणार, जागतिक आर्थिक परिषदेत ३० हजार कोटींचे करार

मॅग्नेटिक महाराष्ट्र २.० या उपक्रमांतर्गत गेल्या २ वर्षांत झालेल्या मागील ९ आवृत्त्यांमध्ये, ९८ सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. त्यापैकी ९३ करार अंमलबजावणीच्या विविध टप्प्यात आहेत. हा औद्योगिक विकासाप्रती राज्याच्या वचनबद्धतेचा पुरावा आहे. याव्यतिरिक्त, कोव्हिड -१९ च्या मागील दोन वर्षांत महाराष्ट्राला एकूण थेट परकीय गुंतवणुकीच्या भारतातील सर्वाधिक २६% प्राप्त झाला.

मॅग्नेटिक महाराष्ट्र २.० (Magnetic Maharashtra) च्या १० व्या आवृत्तीचे प्रमुख मुद्दे

 

इंडोरामा कॉर्पोरेशन आणि इंडोकाउंट इंडस्ट्रीज लिमिटेड या सारख्या प्रमुख वस्त्रोद्योग कंपन्या अनुक्रमे नागपूर आणि कोल्हापूर या महाराष्ट्रातील वस्त्रोद्योग केंद्रांमध्ये गुंतवणूक करत आहेत.

जगातील सर्वात मोठी सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर आयटी कंपनींपैकी एक मायक्रोसॉफ्ट पुण्यात डेटा सेंटर स्थापन करण्यासाठी रक्कम ३२०० कोटी रुपये गुंतवणूक करत आहे,

– इंडोनेशियातील एक अग्रगण्य लगदा आणि कागद उत्पादक कंपनी आशिया पल्प अँड पेपर (एपीपी) ची संस्था सिनर्मास पल्प अँड पेपर प्रायव्हेट लिमिटेड रायगडमध्ये कागद आणि लगदा उत्पादनासाठी १०५०० कोटी रुपयांची गुंतवणूक करीत आहे.

– हॅवमोर आइसक्रीम्स प्रायव्हेट लिमिटेड लिमिटेड पुण्यात आइस्क्रीम तयार करण्यासाठी युनिट सुरू करत असल्याने फूड अँड अॅग्रो प्रोसेसिंगलाही वाव मिळणार आहे. सोनई इटेबल आणि गोयल प्रोटिन्स तेल काढण्यामध्ये समावेश आहे.


हे सुद्धा वाचा :

महाविकास आघाडीत बिघाडी शक्य नाही : हेमंत पाटील

गृहमंत्री वळसे पाटलांनी PWD अधिकाऱ्यांचे कान उपटले !

‘बंजारा व भटक्या विमुक्त वर्गाच्या समस्यांचा शासनाकडे पाठपुरावा करून न्याय मिळवून देऊ’ नाना पटोले यांचे आश्वासन

बांगलादेश मुक्ती लढ्यात नरेंद्र मोदी सहभागी होते, तर बाबरी मस्जिद पाडण्यात फडणवीस निश्चितच अग्रेसर होतेच : अनिल गोटे

हिंदुत्वनिष्ठ असल्याचे सिद्ध करण्यासाठी भाजपाच्या हायब्रीड हिंदुत्ववाद्यांची केविलवाणी धडपड : अनिल गोटे

WEF 2022: Maharashtra inks pact with 23 firms, to invest over Rs 30,000 cr

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी