महाराष्ट्र

महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील यांना भाजपकडून पाच लाख

महाराष्ट्र केसरी जिंकल्यानंतर  कोणत्याही प्रकारचे रोख बक्षीस देण्यात आले नाही अशी खंत सोशल मिडियावर मानाची गदा पटकावणाऱ्या पृथ्वीराज यांनी व्यक्त केली आहे.  

टीम लय भारी 

महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील यांना भाजपकडून पाच लाख

मुंबई: तब्बल २५ वर्षांनी महाराष्ट्र केसरीचं विजेतेपद कोल्हापूरच्या पृथ्वीराज पाटील (Maharashtra kesari prithviraj patil) यांच्याकडे गेलं आहे. मानाची गदा कोल्हापूर कडे आल्यामुळे एकच जल्लोष होतं आहे. महाराष्ट्र केसरी जिंकल्यानंतर  कोणत्याही प्रकारचे रोख बक्षीस देण्यात आले नाही अशी खंत सोशल मिडियावर मानाची गदा पटकावणाऱ्या पृथ्वीराज यांनी व्यक्त केली आहे. (Maharashtra kesari 2022 winner prithviraj patil)

भाजपतर्फे त्यांचा सत्कार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यांना 5 लाख रुपये पुढच्या सरावासाठी देण्याचा निर्णय भाजपाने घेतला आहे,असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील पृथ्वीराजचा (prithviraj patil) सत्कार करणार असल्याचंही त्यांनी जाहीर केले आहे.

महाराष्ट्र केसरीच्या गदेसाठी कोल्हापूरचा पृथ्वीराज पाटील (prithviraj patil) विरूद्ध मुंबई पूर्वचा विशाल बनकर यांच्यात अटीतटीची लढत झाली. या लढाईत कोल्हापूरच्या- पृथ्वीराज पाटील यांनी बाजी मारली आहे.

कोल्हापुरात पृथ्वीराजवर कौतुकाचा वर्षाव होतं आहे. कालच्या विजयानंतर मानाची गदा कुशीत घेऊन पृथ्वीराज निवांत झोपला हा फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

हे सुध्दा वाचा :

Maharashtra Kesari 2022: Kolhapur’s Prithviraj Patil wins title, defeats Mumbai’s Vishal Bankar

हनुमान चालिसा म्हटली तर काही लोकांना राग का येतो? : देवेंद्र फडणवीसांचा सवाल

एसटी कर्मचाऱ्यांचा काल आनंद तर आज सिल्व्हर ओकवर आक्रोश

Tags

आणखी वाचा

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close