29 C
Mumbai
Saturday, April 20, 2024
Homeमहाराष्ट्रयंदा महाराष्ट्र केसरीचा मानकरी कोण ठरणार ?

यंदा महाराष्ट्र केसरीचा मानकरी कोण ठरणार ?

टीम लय भारी 

सातारा : कोरोनाचा फटका जवळपास सर्वच क्षेत्रांना बसला. यात क्रीडा क्षेत्राचाही (Maharashtra kesari) समावेश आहे. त्यातही प्रत्यक्ष संपर्क असलेल्या क्रीडा प्रकारांना अधिक बसला. पण असे असले तरी आता या संकटावर मात करत क्रीडा क्षेत्रही पूर्वपदावर येण्याचा प्रयत्न करत आहे. (Maharashtra kesari competitors 2022)

महाराष्ट्र कुस्तीगिर (Maharashtra kesari) परिषदेचे ६४ वे सामने सातारा जिल्ह्यातील शहू स्टेडीयम या ठिकाणी होत आहेत. महाराष्ट्र केसरीच्या या स्पर्धेसाठी राज्यभरातील सुमारे ९०० मल्लांनी सहभाग घेतला. चार दिवसांपासून साताऱ्याच्या मातीत मल्लांनी आपली चुणूक दाखवली. ही स्पर्धा अंतिम टप्यात पोहचली आहे. उपांत्य फेरीचं चित्र स्पष्ट झालं आहे.

महाराष्ट्र केसरीच्या गदेसाठी कोल्हापूरचा पृथ्वीराज पाटील विरूद्ध मुंबई पूर्वचा विशाल बनकर यांच्यात आज सायंकाळी अंतिम लढत होईल. (Maharashtra kesari)पृथ्वीराजने पुणे शहरच्या हर्षद कोकाटेवर एकतर्फी विजयाची नोंद केली, शेवटच्या क्षणापर्यंत रंगलेल्या लढतीत विशालने वाशिमच्या सिकंदर (Maharashtra kesari) शेखवर तेरा विरुद्ध दहा गुण फरकाने मात केली.

पृथ्वीराज पाटील v/s विशाल बनकर 

पृथ्वीराज व हर्षद यांच्यातील लढत कशी होणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष होते धडपड सुरू झाल्यानंतर एक मिनिट संपला तरी दोन्ही पैलवानांना एकही गुण घेता आला नाही. त्यानंतर (Maharashtra kesari) पृथ्वीराजने एकेरी पटावर दोन गुणांची कमाई केली. दुसऱ्या फेरीत पृथ्वीराज आक्रमक झाला. त्याने भारंदाज डावावर सहा गुण मिळवले. ही लढत त्याने जिंकून प्रेक्षकांची मने जिंकली. माती विभागात वाशिमचा सिकंदर शेख विरूद्ध मुंबई पूर्वच्या विशाल बनकर यांच्यात काटाजोड लढत झाली.

हे सुद्धा वाचा :- 

Maharashtra Kesari 2022: What is Maharashtra Kesari, date, venue and other details

उद्धव ठाकरेंना मिलिंद नार्वेकर म्हणाले :  प्रवीण दरेकर, गिरीश महाजन, प्रसाद लाड यांना शिवबंधन बांधूया

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी