31 C
Mumbai
Saturday, March 23, 2024
Homeमहाराष्ट्रBlind woman :अंध महिलांनी राज्यपालांना बांधली राखी

Blind woman :अंध महिलांनी राज्यपालांना बांधली राखी

'नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड' या संस्थेत प्रशिक्षण घेत असलेल्या नेत्रहीन महिलांनी शुक्रवारी (दि.८) रोजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन येथे भेट घेतली. रक्षाबंधानिमित्त त्यांना राखी बांधली.

महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज अंध भग‍िनींचे (Blind Women) कौतुक केले. त्यांच्या उपक्रमांचा गौरव केला. अंध‍ असूनही त्या आत्मनिर्भर असल्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी म्हणाले.अनेक वेळा वादाच्या भोवऱ्यात सापडणारे राज्याचे राज्यपाल आज वेगळया अंदाजात पाहायला मिळाले. दृष्टिहीन महिलांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना रक्षाबंधन केले.
‘नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड’ या संस्थेत प्रशिक्षण घेत असलेल्या नेत्रहीन महिलांनी शुक्रवारी (दि.८) रोजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन येथे भेट घेतली. रक्षाबंधानिमित्त त्यांना राखी बांधली. राज्यपालांनी देखील त्यांना ओवाळणी दिली. नेत्रहीन व्यक्तींना दृष्टी नसते.परंतु ईश्वर त्यांना त्या ऐवजी काहीतरी विशेष गुण देतो,असे सांगून राज्यपालांनी त्यांच्या कार्याचे कौतुक केले.

हे सुद्धा वाचा

Eknath Shinde : एकनाथ शिंदेंनी शंभूराज देसाईंच्या मतदारसंघासाठी मंजूर केले 4 कोटी

Tricolor : तिरंग्याच्या आडून गटार लपविले, भाजप सरकारचा अजब कारभार

Nilesh Rane : उरलेले फक्त चटई, खुर्च्या उचला… निलेश राणेंकडून शिवसैनिकांसाठी सूचक वक्तव्य

नेत्रहीन व्यक्ती यशस्वी उद्योजक, क्रीडापटू आहेत. तसेच त्या इतरही अनेक क्षेत्रात पुढे आहेत. त्या आत्मनिर्भर आहेत. त्यांना सामाजाकडून सहकार्य हवे आहे. तसेच दिव्यांग असूनही त्यांचे विचार हे सकारात्मक आहेत असेही राज्यपाल यावेळी म्हणाले. यावेळी ‘नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड’ या संस्थेचे अध्यक्ष हेमंत टकले उपस्थित होते. यावेळी त्यांनी नॅबच्या कार्याची माहिती दिली. अंध महिलांनी यावर्षी वाघा आणि अटारी सीमेवर जाऊन आपल्या जवानांना राखी बांधल्याचे यावेळी सचिव पूजा ओबेरॉय यांनी सांगितले. ‘नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड’ ही संस्था नेत्रहीन व्यक्तींच्या प्रशिक्षण आणि शिक्षणासाठी कार्य करते. या संस्थेमधील महिला राखी व तोरण तयार करतात.

आपल्या देशात दर वर्षी अंध बांधव सुंदर राख्या बनवतात. त्या विकतात. तसेच अनेक प्रकारच्या कलाकुसरीच्या वस्तु बनवतात.त्यांना दिसत नसले तरी देखील ते कलाकुसरीच्या वस्तु चांगल्या बनवतात.‍ आता ब्रेललीपीमुळे त्यांच्या शिक्षणाच्या कक्षा रुंदवात गेल्या आहेत. शिक्षणामुळे ते आत्म निर्भर बनले आहेत. मात्र राज्यपालांनी अंध बांधवांच्या उदर निर्वाहासाठी प्रयत्न करण्याचा दिलासा दिला नाही. केवळ कौतुक करुन उपयोग नाही. तर त्यांना समाजाच्या मुळ प्रवाहत येण्यासाठी सरकारी पातळीवरुन प्रयत्न करायला हवेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी