26 C
Mumbai
Sunday, August 7, 2022
घरमहाराष्ट्रपावसाच्या पाण्याने घातला विदर्भाला वेढा

पावसाच्या पाण्याने घातला विदर्भाला वेढा

टीम लयभारी

गडचिरोली: महाराष्ट्रात पावसाने धुमाकूळ घातला आहे. विदर्भाला पावसाने झोडपून काढले आहे. चंद्रपूर जिल्हयातील ईरई नदी तसेच उमा नदीचे पाणी पत्राच्या बाहेर आले आहे. पावसामुळे चंद्रपूरला पुराचा वेढा पडला आहे. चिमूर शहराला बेटाचं स्वरुप आले आहे. गडचिरोली जिल्हयात भामरागडचा संपर्क तुटला. मोठा पूल पाण्याखाली गेला. 100 गावांचा संपर्क तुटला आहे. प्रशासनाने नागररिकांना सुरक्षीतस्थळी हलवले आहे.

वर्धा जिल्हयातही पावसाचे थैमान सुरु आहे. यशोदा आणि बकूळी नदीला पूर आला आहे. निम्न वर्धा धरणाचे 31 दरवाजे उघडले आहेत. संततधार पावसामुळे बाळापूर शहराला पाण्याचा वेढा पडला आहे. सगळी धरणं ओसंडून वाहत आहेत. दुकानात आणि घरांमध्ये पाणी गेले. त्यामुळे नागरिकांचे आतोनात नुकसान झाले आहे. रस्ते धुवून निघाले आहेत. अनेक ठिकाणी वीजेचे खांब उन्मळून पडले आहेत. मोठे वृक्ष उन्ममळून पडले आहेत. एनडी आरएफची पथकं घटनास्थळी तैनात करण्यात आली आहेत.

हे सुध्दा वाचा:

साईबाबांच्या तिजोरीत 5 कोटी 12 लाखांचे दान

राष्ट्रपती पदाच्या शर्यतीत द्रौपदी मुर्मूंच्या विजयाची भाजपला खात्री

इंदौरहुन पुण्याला येणारी ‘महाराष्ट्र राज्य परिवहन’ची बस नर्मदा नदीमध्ये कोसळली; बसमध्ये 55 प्रवासी होते

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!