30 C
Mumbai
Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रदहावी व बारावीच्या परीक्षा ऑफलाईन होणार - शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड

दहावी व बारावीच्या परीक्षा ऑफलाईन होणार – शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड

 

टीम लय भारी

मुंबई :- राज्यात इयत्ता दहावी व बारावीची परीक्षा ऑफलाईन घेण्यात येणार असल्याचे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी विधानसभेत स्पष्ट केले. यासंदर्भात सदस्य सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत मुद्दा उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले की, यावर्षी परीक्षा होणारच आहे, असे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Education Minister Varsha Gaikwad) यांनी विधानसभेत ठणकावून (Maharashtra Vidhan Sabha) सांगितले. आमची प्राथमिकता मुलांच्या आरोग्याला आहे. त्यामुळे सर्व काळजी घेऊनच आम्ही परीक्षा घेणार आहोत, असे वर्षा गायकवाड यांनी सांगितले.  दहावी व बारावीच्या परीक्षा हा महत्वाचा विषय असून शिक्षण विभागामार्फत याबाबत विविध मुद्यांवर चर्चा केली जात आहे.

त्यानुसार या दोन्ही परीक्षा ऑफलाईन घेण्याचे ठरविण्यात आले आहे. दहावीसाठी साधारणत: १६ लाख तर बारावीसाठी १५ लाख विद्यार्थी आहेत. कोरोनामुळे गेल्यावर्षीचे शैक्षणीक वर्ष अडचणीचे गेले आहे. अद्यापही राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याला प्राथमिकता देताना परीक्षा कशा पद्धतीने आणि सुरक्षितपणे घेण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.

परीक्षा ऑफलाईनच होणार

याबाबत वर्षा गायकवाड म्हणाल्या, “कोरोनाची परिस्थिती आहे त्यात मुलांचे आरोग्य, सुरक्षा ही आमची प्राथमिकता आहे. खूप साऱ्या तज्ज्ञांशी शिक्षण विभाग बोलत आहे. सध्यातरी जी दहावी-बारावी बोर्डाची तारीख दिली आहे त्यानुसारच परीक्षा या ऑफलाईनच होणार आहे.”

ऑगस्टला आम्ही सिलॅबस कमी करून नोव्हेंबरमध्ये बोर्डाचा पेपर पॅटर्न ठरतो, त्याची तपासणी करायचे ठरते. त्यात गावखेड्यात पेपर पोहोचवायला कमीत कमी दोन महिने लागतात. हे सगळे करत असताना बोर्डाला सुद्धा वेळ लागतो.

दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीच्या माध्यमातून १५ मार्च पासून विविध विषयांसंदर्भात माहिती पोहचविण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. अन्य मंडळांच्या परीक्षांच्या तारखा पाहूनच वेळापत्रक केल्याचेही वर्षा गायकवाड यांनी सांगितले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी