28 C
Mumbai
Thursday, March 28, 2024
Homeमहाराष्ट्रनेपाळमध्ये विमान अपघातात ४० ठार

नेपाळमध्ये विमान अपघातात ४० ठार

नेपाळमधील (Nepal) पोखरा आंतरराष्ट्रीय विमानतळानजीक रविवारी सकाळी ‘येति एअरलाईन्स एअरक्राफ्ट’ च्या विमानाला अपघात झाल्यामुळे ४० लोकांचा दुर्दैवी अंत झाला आहे. या विमानात पाच भारतीय प्रवासीदेखील असल्याची माहिती समोर आली आहे. दुर्घटना स्थळी बचावकार्य वेगात सुरू असून मृतांचा एकदा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. नेपाळची राजधानी काठमांडू (Kathmandu) येथून उड्डाण केलेल्या या विमानात एकूण ७२ जण प्रवास करत होते. त्यापैकी ९८ प्रवासी तर चार जण विमानातील कर्मचारी होते. पश्चिम नेपाळमधील पोखरा येथे जुने आणि नवीन विमानतळांच्यामध्ये हे विमान कोसळून ही दुर्घटना झाल्याची प्राथमिक माहिती आहे. (40 killed in plane crash in Nepal)

या अपघातग्रस्त विमानात दोन लहान मुलांसह १० परदेश नागरिकही प्रवास करीत होते. प्रवाशांमध्ये ५३ नेपाळी, ५ भारतीय, ४ रशियन, २ कोरियन, आयर्लंड, फ्रान्स, अर्जेंटिना आणि अफगाणिस्तानच्या प्रत्येकी एका नागरिकाचा समावेश होता. या घटनेनंतर नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल प्रचंड यांनी तातडीने कॅबिनेटची बैठक बोलाऊन परिस्थितीचा आढावा घेतला. सर्व यंत्रणांना बचावकार्यात सहकार्य कारण्याचचे आदेशही प्रचंड यांनी दिले आहेत.

नेपाळच्या नागरी उड्डाण प्राधिकरणाने सांगितले की, या विमानाने काठमांडूच्या त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सकाळी १०.३३ वाजता उड्डाण केले. पोखरा विमानतळावरील धावपट्टीवर उतरतेवेळी एका डोंगराला आदळून हे विमान सेती नदीत जाऊन कोसळले. विमानाने उड्डाण केल्यानंतर अवघ्या २० मिनिटांत हा अपघात घडला. दुर्घटना स्थळी धुराचे प्रचंड लोट दिसत होते. या अपघातात कोणी बचावले का याबाबत अद्याप समजू शकले नसल्याचे माहिती विमान कंपनीचे प्रवक्ते सुदर्शन बारतौला यांनी दिली. बचावकार्य सुरु असून मृतांचा एकदा वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी