34 C
Mumbai
Saturday, April 20, 2024
Homeमहाराष्ट्रएकाच वेळी 400 पदाधिकाऱ्यांनी 'राज ठाकरें'ना केला अखेरचा जय महाराष्ट्र !

एकाच वेळी 400 पदाधिकाऱ्यांनी ‘राज ठाकरें’ना केला अखेरचा जय महाराष्ट्र !

मनसे पुणे माथाडी कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष निलेश माझिरे यांच्यासह तब्बल 400 पदाधिकाऱ्यांनी राजिनामा दिला आहे. माथाडी कामगार आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदावरून हकालपट्टी करण्यात आल्यानंतर निलेश माझिरे आणि 400 पदाधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे.

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आगामी महापालिका निवडणूकीसाठी कंबर कसली असल्याचे पाहायला मिळत आहे. राज ठाकरे हे सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. ते राज्यातील ठिकठिकाणी जाऊन पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेऊन पक्ष मजबूत करण्याचे काम करत असतानाच पुण्यातून मनसेला मोठा धक्का बसल्याचे चित्र समोर आले आहे. मनसे पुणे माथाडी कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष निलेश माझिरे यांच्यासह तब्बल 400 पदाधिकाऱ्यांनी राजिनामा दिला आहे. माथाडी कामगार आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदावरून हकालपट्टी करण्यात आल्यानंतर निलेश माझिरे आणि 400 पदाधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे.

निलेश माझिरे यांच्यासह जवळपास 400 कार्यकर्त्यांनी पक्षाला रामराम केल्याने आता महापालिका निवडणूकीच्या तोंडावर मनसेला मोठा धक्का बसला आहे. गेल्याच आठवड्यात मनसे नेते वसंत मोरे यांनीही पक्षाबद्दल जाहीरपणे नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर माझिरे यांची हकालपट्टी आणि आता कार्यकर्त्यांचे राजिनामा सत्र यावरून पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आल्याचे पाहायला मिळत आहे.

हे सुद्धा वाचा

गुजरात जिंकण्यासाठी मोदींना मेहनत घ्यावी लागतेय, संजय राऊतांचा हल्लाबोल

शिवरायांचा एकेरी उल्लेख करणाऱ्या रावसाहेब दानवेंच्या घरी शिवभक्त धडकणार

महाराष्ट्रातील सर्व सरकारी कार्यालयांमध्ये 1 एप्रिलपासून होणार मोठे बदल !

काही महिन्यांपूर्वी देखी पुण्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शहराध्यक्ष पदावरून वसंत मोरे यांची उचलबांगडी केल्यानंतर पक्षाला असाच काहीसा विरोध सहन करावा लागला होता. त्यावेळी देखील अचानकपणे वसंत मोरे यांच्याकडून पदभार काढून घेतल्यानंतर कार्यकर्ते नाराज झाल्याचे दिसत होते. आता मात्र वसंत मोरे यांचे खंदे समर्थक असणाऱ्या निलेश माझिरे यांची हकालपट्टी केल्यानंतर कार्यकर्त्यांचा रोष उफाळून आला आहे. त्यामुळे आता पुण्यात मनसेला मोठा झटका बसला आहे आणि याचे परिणाम आगामी महापालिका निवडणूकीत पाहायला मिळतील असे विश्लेेषकांचे मत आहे.

दरम्यान आता या सर्व कार्यकर्त्यांनी पक्षाला रामराम केल्यामुळे पक्षाची ताकदज पुण्यात कमी झाल्याचे जाणवत आता. अशा परिस्थितीत पक्ष आगामी महापालिका निवडणूकीत टिकू शकेल का अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. एकीकडे राज ठाकरे हे पक्ष बांधणीसाठी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करत असताना आणि राज्यभर दौरे करत असतानाच, दुसरीकडे मोठं खिंडार पडल्यामुळे मनसेत नाराजी, पक्षांतर्गत खदखद सुरू असल्याचे दिसून येते आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी