30 C
Mumbai
Sunday, December 10, 2023
घरमहाराष्ट्रElectronics Manufacturing Cluster : राज्यात 500 कोटींचा प्रकल्प होणार; केंद्र सरकारकडून मिळाली...

Electronics Manufacturing Cluster : राज्यात 500 कोटींचा प्रकल्प होणार; केंद्र सरकारकडून मिळाली मंजूरी !

देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात 500 कोटींच्या प्रकल्पाला मंजूरी मिळाल्याचे ट्विटव्दारे जाहीर केले आहे.

वेदांता-फॉक्सकॉन नंतर टाटा एअरबससारखा मोठा प्रकल्प राज्याबाहेर गेल्यामुळे विद्यमान शिंदे-फडणवीस सरकारवर विरोधीपक्षांकडून टीकेची झोड उठवली जात आहे. तर सत्ताधाऱ्यांकडून देखील मागील सरकारच्या काळातच प्रयत्न न झाल्यामुळे हे उद्योग राज्याबाहेर गेल्याचा दावा केला जात आहे, सध्या राज्यातील अनेक मोठे प्रकल्प राज्याबाहेर जात आहेत त्यामुळे सर्वसामांन्याकडून देखील सवाल उपस्थित केले जात आहेत, या सर्व गदारोळात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात 500 कोटींच्या प्रकल्पाला मंजूरी मिळाल्याचे ट्विटव्दारे जाहीर केले आहे.
फडणवीस यांनी केलेल्या ट्विट मध्ये म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुणे जिल्ह्यात 500 कोटींच्या प्रकल्पाला मंजूरी दिली आहे. या प्रकल्पामुळे, राज्यात 5 हजार रोजगार निर्माण होणार असल्याचे देखील त्यांनी या ट्विटमध्ये म्हटले आहे. पंतप्रधानांनी पुणे जिल्ह्यातील रांजणगाव येथे इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर सुरू करण्याचे निर्देश दिले असून हा प्रकल्प नॅशनल पॉलिसी ऑन इलेक्ट्रॉनिक्स अंतर्गत होणार असल्याचे फडणवीस यांनी या ट्विटमध्ये म्हटले आहे. हा प्रकल्प 297.11 एकरमध्ये होणार असून प्रकल्पासाठी 492.85 कोटी रुपये खर्च होणार आहे. त्यातील 207.98 कोटी रुपये केंद्र सरकार देणार आहे.

दरम्यान, रांजणगावमध्ये होणाऱ्या या नव्या प्रकल्पामुळे राज्यातील 5 हजार युवकांना नोकरीची संधी निर्माण करेल. या 2 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक आकर्षित करण्याचे या प्रकल्पाचे लक्ष्य असेल, असेही फडणवीस यांनी या व्टिटमध्ये म्हटले असून हा प्रकल्प पुढील 32 महिन्यात कार्यान्वित होणार असल्याचंही फडणवीस म्हणाले.

हे सुद्धा वाचा :
Sharad Pawar : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांची तब्येत खालावली! मुंबईतील ब्रीज कँडी रुग्णालयात दाखल

रवी राणा ‘वर्षा’वर भेटले, बच्चु कडूंबाबतच्या वक्तव्यावर दिलगिरी; बच्चु कडूंची भूमिका काय?

INFLATION : देशातील महागाईचा सामना करण्यासाठी धोरणात्मक प्रयत्न आवश्यक! आरबीआयचे विधान

गेल्या काही महिन्यांत राज्यातील अनेक प्रकल्प गुजरात तसेच अन्य राज्यांत गेल्यामुळे विरोधी पक्षांनी मु्ख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केले आहे. राज्यातील प्रकल्प गुजरातमध्ये जाण्याला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हेच कारणीभुत आहेत, ते महाराष्ट्रासाठी नव्हे तर गुजरातसाठी काम करत आहेत अशी जहरी टीका देखील विरोधकांकडून करण्यात येत आहे. दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत विरोधकांना उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी