26 C
Mumbai
Monday, March 20, 2023
घरक्राईमन्यूमोनिया बरा करण्यासाठी लोखंडी सळईचे ५१ वेळा चटके ; ३ महिन्यांच्या चिमुरडीचा...

न्यूमोनिया बरा करण्यासाठी लोखंडी सळईचे ५१ वेळा चटके ; ३ महिन्यांच्या चिमुरडीचा मृत्यू

मध्य प्रदेशातील शहडोल जिल्ह्यात एका तीन महिन्यांच्या चिमुरडीचा पोटावर ५१ वेळा तापलेल्या लोखंडी सळईने चटके दिल्याने तिचा मृत्यू झाला आहे. या चिमुरडीला न्युमोनिया झाला होता. तिच्यावर उपचार म्हणून तापलेल्या सळईने तिला मारहाण करण्यात आली. या अमानुष उपचार पद्धतीमुळे त्या लहानगीला आपला जीव गमवावा लागला आहे. (51 strokes of an iron rod to cure pneumonia) या चिमुरडीचा तब्येत बिघडल्यानंतर तिला रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले. मात्र तोपर्यंत तिच्या संपूर्ण शरीरात संसर्ग झाल्याचे रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले. मध्य प्रदेशमध्ये आदिवासी भागात न्यूमेनियावर उपचार करण्यासाठी हीच ‘उपचार पद्धती’ प्रचलित आहे. अशा प्रकारच्या अंधश्रद्धेमुळे कित्येक लहानग्यांना आपला जीव गमवावा लागला आहे.

या मुलीला श्वास घेण्यास त्रास होत होता हळूहळू तिची प्रकृती अधिक खालावत गेल्यानंतर तिला शहाडोलवैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले, जिथे उपचारादरम्यान तिचा बुधवारी मृत्यू झाला, असे वृत्त एका इंग्रजी वृत्तपत्राने दिले आहे. सादर करण्यात आलेल्या अहवालानुसार या मुलीचा मृतदेह दफन करण्यात आला होता. शनिवारी तो मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदन करण्यात येणार आहे. शहडोलच्या जिल्हाधिकारी वंदना वैध यांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला व बालविकास अधिकारी जेव्हा रुग्णालयात पोहोचले तेव्हा त्यांना १५ दिवसांपूर्वी घडलेली ही अंधश्रद्धेची धक्कादायक घटना आढळून आली. बाळावर न्यूमोनियावर योग्य ते उपचार न करण्यात आल्याने तिची प्रकृती खालावत गेली. एका स्थानिक अंगणवाडी सेविकेने तिच्या आईचे समुपदेशन केले आणि त्या मुलीला गरम सळईने मारहाण न करण्याची विनंती केली, असे वैध यांनी सांगितले.

या मुलीला वेळीच योग्य ते उपचार मिळाले असते तर तिचा जीव वाचू शकला असता. या मुलीला रुग्णालयात दाखल करण्यात आले तोपर्यंत बराच उशीर झाला होता. तिच्या शरीरात संसर्ग पसरला होता. वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे तिचा दुर्दैवी अंत झाल्याचे जिल्हाधिकार्‍यांनी सांगितले. या प्रकरणाची आम्ही चौकशी करत आहोत आणि न्यूमोनियावर अशा पद्धतीचे अमानुष उपचार करणाऱ्या संबंधित महिलेवर गुन्हा दाखल करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी वंदना वैध यांनी सांगितले. न्यूमोनियावर “उपचार” करण्यासाठी पलेल्या लोखंडी सळईने चटके देण्याची प्रथा मध्य प्रदेशातील अनेक आदिवासीबहुल भागात प्रचलित आहे.

हे सुद्धा वाचा

Thane Crime : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शहरात हत्येच्या घटनांनी उडाली खळबळ

Pune Crime News: मुल होत नव्हते म्हणून मांत्रिकाला बोलावले; पती, सासूवर गुन्हा दाखल

राजस्थानमधील कार्यकर्त्यांचा एकनाथ शिंदे यांच्या पक्षात प्रवेश

 

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी