29 C
Mumbai
Saturday, April 20, 2024
Homeमहाराष्ट्रकाय सांगता...? 74 वर्षीय तरुणाचा चक्क मोटारसायकलवरून सांगली ते अमरनाथ प्रवास

काय सांगता…? 74 वर्षीय तरुणाचा चक्क मोटारसायकलवरून सांगली ते अमरनाथ प्रवास

टीम लय भारी

सांगली : कोण काय करेल याचा नेम नाही. अनेकजण काहीतरी वेगळं करायचं म्हणून शक्कल लढवत असल्याचे दिसून येतात. अशीच एक व्यक्ती सध्या सोशल मिडीयावर चर्चेचा विषय ठरली आहे. सांगली येथील जे. के. चव्हाण नावाचे 74 वर्षीय गृहस्ठ चक्क मोटाकसायकलने अमरनाथ यात्रेला निघाले आहेत. चव्हाण यांचा हा अनोखा उत्साह पाहून अनेकांनी आश्चर्याने बोटेच तोंडात घातली आहेत.

सांगलीतील रहिवासी जे. के. चव्हाण यांची शंकरावरील अलोट भक्ती असल्यामुळे त्यांनी यंदा मोटारसायकलने अमरनाथ जाण्याचा निर्णय घेतला आणि ते निघाले सुदधा. याचा व्हिडिओ सुद्धा सोशल मिडीयावर चांगलाच धुमाकुळ घालत आहे.

यामध्ये पांढऱ्या रंगाचा कुर्ता, पांढरी गांधी टोपी आणि पांढरी शुभ्र पॅंट परिधान केलेले जे. के. चव्हाण आपले गरजेचे सामान मोटारसायकलला गुंडाळून प्रवास करत असल्याचे दिसत आहे.

या प्रवासाविषयी बोलताना चव्हाण म्हणतात, पवित्र गुहेला भेट देण्यात मला खूप आनंद मिळतो आणि मला कशाचीही भिती वाटत नाही आणि मला कधीही धोका वाटत नाही. जेव्हा भगवान शिव माझी काळजी घेण्यासाठी तिथे असतात तेव्हा मला कशाचिही भीती का वाटली पाहिजे.

दरम्यान, या प्रवासात 10 हजार 700 रुपयांचे पेट्रोल वापरल्याचे त्यांनी सांगितले आहे, तसेच ते दररोज ५०० किमी अंतर ते मोटारसायकलने पार करत असल्याचे ते सांगतात. या प्रवासात रात्रीच्या वेळी ते रस्त्यात लागणाऱ्या एखाद्या मंदीरात थांबत. बऱ्याचदा त्यांचे जेवण लंगरमुळेच होत. अगदीच लंगर नसले तर ते एखाद्या हाॅटेलमध्ये ते जेवत असत.

सांगलीतील हा अगदी सामान्य शेतकरी दरवर्षी न चुकता अमरनाथ यात्रा करतो. याआधी त्यांनी 12 वर्षे सायकलवरून, सहा वर्षे पायी चालत त्यांनी अमरनाथ यात्रा केली आहे. 2014 पासून ते दुचाकीवरून अमरनाथ यात्रा करत आहेत.

हे सुद्धा वाचा…

शिंदे गटातील आमदार म्हणतात ‘मंत्री पद कोणाला नकोय?’

‘उद्धव साहब हम आपके साथ है’ चिमुकलीने दिला धीर

खेड्यापाड्यातील विद्यार्थ्यांना दडपण्याचे षडयंत्र? मागास वर्गीय मुलांची मदतीसाठी हाक

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी