33 C
Mumbai
Wednesday, April 17, 2024
Homeमहाराष्ट्रCyrus Mistry : सायरस मिस्त्री अपघात प्रकरणी कार चालक महिलेवर गुन्हा दाखल

Cyrus Mistry : सायरस मिस्त्री अपघात प्रकरणी कार चालक महिलेवर गुन्हा दाखल

उद्योगपती सायरस मिस्त्री अपघात प्रकरणी दोन महिन्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर चारोटी येथे टाटा सन्सचे माजी चेअरमन सायरस मिस्त्री आणि जहांगीर पंडोले यांचा भीषण अपघात मृत्यू झाला होता.

उद्योगपती सायरस मिस्त्री अपघात प्रकरणी दोन महिन्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर चारोटी येथे टाटा सन्सचे माजी चेअरमन सायरस मिस्त्री आणि जहांगीर पंडोले यांचा भीषण अपघात मृत्यू झाला होता. तर डॉ. अनाहिता पंडोले आणि त्यांचे पती डेरियस पंडोले गंभीर जखमी झाले होते. अपघाताच्या वेळी डॉ. अनाहिता पंडोले कार चालवत होत्या. अनहिता पंडोले यांच्याविरोधात कलम ३०४(अ ), २७९, ३३७, ३३८ प्रमाणे पालघरच्या कासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हा अपघात ४ सप्टेंबर रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास सूर्या नदीच्या पुलाच्या झाला होता. यावेळी अनाहिता पंडोले आणि डेरियस पंडोले पुढे बसले होते. तर कार अनहिता पंडोले चालवत होत्या. तर मागच्या सीटवर बसलेल्या सायरस मिस्त्री आणि जहांगीर पंडोले यांनी सीट बेल्ट लावला नव्हता, त्यांचा या अपघातात जागीच मृत्यू झाला होता. पोलिसांनी सांगितले की, मर्सिडीजने चारोटी चेकपोस्ट पार केल्यानंतर नऊ मिनिटांत २० किमी अंतर कापले होते.
हे सुद्धा वाचा :

Mumbai Bridge : अंधेरीतील गोखले पूल तब्बल दोन वर्षे राहणार बंद

Chief Justice Uday Lalit : प्रत्येक जिल्ह्याची माहिती असावी यासाठी मोटरसायकल वरून दौरा केला; सरन्यायाधीश उदय लळीत यांनी सांगितली महाराष्ट्राच्या मातीची आठवण

Sharad Pawar : शरद पवारांविषयी जितेंद्र आव्हाडांची भावनिक पोस्ट

सध्याही डॉक्टर अनाहिता पंडोले या रुग्णालयामध्ये अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत. त्यांचे पती डेरिअस पंडोले यांना डिस्चार्ज दिल्यानंतर पालघर पोलिसांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन या अपघातासंदर्भात अपघाताच्या दोन महिन्यानंतर त्यांचा जबाब नोंदवून घेतला. त्यानंतर अनाहिता पंडोले यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी