28 C
Mumbai
Saturday, August 6, 2022
घरमहाराष्ट्रअमरावतीत कॉलरामुळे चिमुकलीचा मृत्यू

अमरावतीत कॉलरामुळे चिमुकलीचा मृत्यू

टीम लय भारी

अमरावती : राज्यात पुन्हा एकदा साथीच्या आजारांनी डोके वर काढलेले असताना नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे राज्यातील आरोग्य यंत्रणा देखील सतर्क झाली आहे. पण अमरावतीमध्ये कॉलराचा (cholera) प्रादुर्भाव वाढताना दिसून येत आहे. कॉलरामुळे अमरावती जिल्ह्यातील अचलपूरमध्ये एका दोन वर्षीय चिमुरडीला आपला जीव गमवावा लागला आहे (A child dies of cholera in Amravati). या घटनेमुळे जिल्ह्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी दूषित पाणी (Contaminated water) पिल्याने तीन जणांना आपला जावं गमवावा लागला होता. तर ७० पेक्षा अधिक लोकांची प्रकृती देखील बिघडली होती. हि घटना जिल्ह्यातील मेळघाटच्या पाचडोंगरी भागात घडली. तर जिल्ह्यात आता पर्यंत कॉलरामुळे सहा जणांचा मृत्यू झाला आहे. ज्यामुळे जिल्ह्यात भीतीचे वातावरण पसरले आहे. वेदश्री मेहरे असे कॉलरामुळे मृत्यू झालेल्या दोन वर्षीय चिमुरडीचे नाव आहे. ती अमरावती की जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यातील शिंदी (बु.) या गावात वास्तव्यास होती.

वेदश्रीला कॉलराची लागण झाल्यानंतर तिला सावंगी मेघे येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. पण अखेरीस तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. चिमुकल्या वेदश्रीच्या मृत्यूमुळे गावात शोककळा पसरली आहे. दरम्यान, ९० दिवसांत ५२ बालके दगावली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ज्यामुळे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेवर प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत.

हे सुद्धा वाचा :

खासदार भावना गवळींच्या पूर्वाश्रमीच्या पतीने केला शिवसेनेत प्रवेश

भाजप युवा आघाडीच्या नेत्याच्या हत्येचे गुढ वाढले

मंत्रिमंडळाच्या बैठकीत खडाजंगी; मुख्यमंत्र्यांवर अन्य मंत्री वैतागले !

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!