30 C
Mumbai
Tuesday, August 2, 2022
घरमहाराष्ट्रइंदौरहुन पुण्याला येणारी 'महाराष्ट्र राज्य परिवहन'ची बस नर्मदा नदीमध्ये कोसळली; बसमध्ये 55...

इंदौरहुन पुण्याला येणारी ‘महाराष्ट्र राज्य परिवहन’ची बस नर्मदा नदीमध्ये कोसळली; बसमध्ये 55 प्रवासी होते

टीम लय भारी

इंदौर : मध्यप्रदेशच्या धार जिल्हयात आज सकाळी इंदौरहून पुण्याकडे येणारी बस नर्मदा नदीमध्ये कोसळली. यामध्ये सुमारे 55 प्रवासी होते. यामध्ये 13 लहान मुलांचा समावेश होता. बस बाहेर काढण्यात यश आले आहे. 15 हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून, अनेकांना वाचवण्यात यश आले आहे. अमळनेर खलघाट ठिगरी येथे हा अपघात झाला. पावणे दहा वाजता ही घटना घडली. संजय सेतू पूलवर ही घटना घडली. हा अपघात इंदौरपासून 80 किमी अंतरावर झाला.

तांत्रिक बिघाडामुळे हा अपघात झाला. 7 कुटुंब या बसमध्ये होती. यामध्ये 13 लहान मुलं होती. मध्यप्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी 15 प्रवाशांना बाहेर काढल्याचे म्हटले आहे. खलघाटामध्ये ही बस इतर वाहनांचा ओव्हरटेक करत असतांना वाहकाचे बस वरील नियंत्रण तुटल्याने हा अपघात घडला. जोरदार मदत कार्य सुरु आहे. ही बस महाराष्ट्र राज्य परिवहनची आहे. मुख्यमंत्री शिवराज सिंह चैहान यांनी शासकीय मदतीची घोषणा केली आहे. प्रशासनाबरोबर स्थानिकांनी देखील मदत कार्य सुरु केले आहे.

हे सुध्दा वाचा:

मुंबईला आज पुन्हा ‘ऑरेंज अलर्ट’, विश्रांतीनंतर पाऊस पुन्हा ‘इन अॅक्शन’ मोडमध्ये

विकास कामांची ऐसीतैसी, मुख्यमंत्री शिंदे अजित पवारांचा घेणार बदला?

‘काय त्या स्टोऱ्या, काय त्या फोकनाड्या, काय ती गरीबी, एकदमच वोक्केमंदी!’ शिंदेगटाविरोधात नरकेंचा हल्लाबोल

 

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!