30 C
Mumbai
Tuesday, April 23, 2024
Homeमहाराष्ट्रAaditya Thackeray Tour : आदित्य ठाकरेंचे गुलाबराव पाटील यांच्या मतदारसंघातील पोस्टर फाडले

Aaditya Thackeray Tour : आदित्य ठाकरेंचे गुलाबराव पाटील यांच्या मतदारसंघातील पोस्टर फाडले

आदित्य ठाकरे यांचा आज जळगाव जिल्ह्याचा दौरा असल्याने जळगाव शहरात बहुतांश ठिकाणी त्यांचे पोस्टर लावण्यात आले आहे. पण काही अज्ञातांकडून शुक्रवारी मध्यरात्री हे पोस्टर फाडण्यात आले.

शिवसेनेचे युवा प्रमुख आणि वरळी विधानसभेचे आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) हे आज (ता. २० ऑगस्ट) जळगाव जिल्ह्याचा दौरा करणार आहेत. या दौऱ्याच्या निमित्ताने शिव संवाद यात्रेच्या मार्फत आदित्य ठाकरे हे शिवसैनिकांशी संवाद साधणार आहेत. परंतु जळगावमधील आदित्य ठाकरे यांच्या या दौऱ्यामुळे जिल्ह्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात जळगाव जिल्ह्यातील पाच आमदार सहभागी झाले आहेत. ज्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला जिल्ह्यामध्ये मोठा फटका बसला. त्यामुळे याच अनुषंगाने आता आदित्य ठाकरे नव्याने शिवसेना पक्षाची जळगाव जिल्ह्यात बांधणी करण्यासाठी शिव संवाद यात्रेतून शिवसैनिकांशी संवाद साधणार आहेत. आदित्य ठाकरे हे एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदार किशोर पाटील, चिमण आबा पाटील आणि गुलाबराव पाटील यांच्या मतदारसंघात शिव संवाद यात्रा घेणार आहेत.

आदित्य ठाकरे हे आज सर्वात पहिल्यांदा जळगावातील धरणगावात शिव संवाद यात्रा घेणार आहेत. पण या गावात ते ज्या मार्गाने प्रवेश करणार आहेत, त्याच मार्गावर असलेले आदित्य ठाकरे यांचे पोस्टर अज्ञातांकडून फाडण्यात आले. शुक्रवारी मध्यरात्री हे पोस्टर फाडण्यात आल्याची घटना घडली आहे. आदित्य ठाकरे यांचे पोस्टर फाडल्याची माहिती जिल्ह्यात पसरताच काही वेळेसाठी याठिकाणी तणाव सुद्धा निर्माण झाला. दरम्यान, आदित्य ठाकरे यांच्याकडून धरणगाव शहरात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज स्मारकजवळ आयोजित करण्यात आला आहे.

हे सुद्धा वाचा

Aaditya Thackeray : यशवंत जाधवांच्या मतदार संघातही आदित्य ठाकरेंना दणक्यात प्रतिसाद !

Ramdas Kadam : बाळासाहेब असते तर शिवसेनेने कॉंग्रेससोबत युती केली असती का ? रामदास कदमांची आदित्य ठाकरेंवर आगपाखड

हिंदुत्वावर खेळी खेळणाऱ्या शिंदे गटाला आदित्य ठाकरेंनी फटकारले

आदित्य ठाकरे यांचा आज जळगाव जिल्ह्याचा दौरा असल्याने जळगाव शहरात बहुतांश ठिकाणी त्यांचे पोस्टर लावण्यात आले आहे. पण काही अज्ञातांकडून शुक्रवारी मध्यरात्री हे पोस्टर फाडण्यात आले. एकूण सहा ते सात ठिकाणी असलेले पोस्टर काही अज्ञातांनी फाडल्याचे सांगण्यात येत आहे. परंतु सदर घटनेमुळे शहरातील उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील समर्थकांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान, सदर घटनेची माहिती शहरात पसरताच पोलीस ठाण्याचे निरीक्षक राहुल खताळ आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन घडलेल्या घटनेची पाहणी केली. तसेच शिवसेनेचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते सुद्धा ज्या ज्या ठिकाणी पोस्टर फाडण्यात आले, त्याठिकाणी उपस्थित होते. पण शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन केले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी