26 C
Mumbai
Wednesday, November 30, 2022
घरमहाराष्ट्रAbdul Sattar Apology : 'मी माफी मागेन पण...' सुप्रिया सुळेंवरील 'त्या' टीकेवर...

Abdul Sattar Apology : ‘मी माफी मागेन पण…’ सुप्रिया सुळेंवरील ‘त्या’ टीकेवर अब्दुल सत्तारांचं स्पष्टीकरण

सुप्रिया सुळे यांनी केलेल्या टीकेबाबत एका पत्रकारानी प्रश्न विचारला असता उत्तर देताना अब्दुल सत्तारांची जीभ घसरली. त्यानंतर अगदी काही वेळातचं कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिलगीरी व्यक्त केली.

महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री आणि शिंदे गटाचे नेते अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळेंबाबत विधान करत अशताना शिविगाळ केल्याचा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाला. त्यानंतर महाराष्ट्रातील अनेक ठिकाणांहुन त्यांच्यावर टीकेची झओळ उठली आहे. विशेष म्हणजे सुप्रिया सुळे यांनी केलेल्या टीकेबाबत एका पत्रकारानी प्रश्न विचारला असता उत्तर देताना अब्दुल सत्तारांची जीभ घसरली. त्यानंतर राज्यभरातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले. आणि अगदी काही वेळातचं कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिलगीरी व्यक्त केली. सोबतंच “मी महिलांचा नेहमीच सन्मान करतो. मी महिलांबाबत एकही शब्द बोललेलो नाही. मी बोलल्यामुळे महिला भगिनींची मनं दुखली असतील तर, मी जरूर खेद व्यक्त करेन. परंतु मी असे काहीही बोललेलो नाही, असे सत्तार म्हणाले आहेत. ते माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते.” असं म्हणत अब्दुल सत्तार यांनी आपल्या विधानाचे स्पष्टीकरण दिले.

“मी जे बोललो ते फक्त खोक्यांच्याबद्दल बोललो. परंतु, त्याचा कोणी वेगळा अर्थ काढू नये. मी महिलांचा सन्मान करणारा नेता आहे. मी कोणत्याही महिलेच्या विरोधात बोललो नाही,” असं अब्दुल सत्तार यांनी यावेळी म्हटले. परंतु, माफी मागत असताना सत्तार यांनी सुप्रिया सुळे यांचं नाव घेण्याचं टाळलं आहे.

हे सुद्धा वाचा

Solapur News : ‘राष्ट्रीय फोरेन्स नाईटिंगल पुरस्कार 2021’वर सोलापूरच्या लेकीने कोरले नाव

Abdul Sattar : कृषी मंत्री अब्दुल सत्तार बरळले; सुप्रिया सुळे यांना म्हणाले भिकार****

Nagpur Rape Case : स्कूल व्हॅन चालकाकडून विद्यार्थीनीवर अत्याचार; आरोपीच्या मुसक्या आवळल्या

विशेष म्हणजे अब्दुल सत्तारांच्या या विधानानंतर त्यांच्यासोबत सत्तेत असणाऱ्या शिंदे गटातील नेत्यांकडूनदी खेद व्यक्त करण्यात आला आहे. उद्योग मंत्री अदय सामंत यांनी “मंत्री महाेदय यांनी चुकीचे वक्तव्य केले आहे. त्यांच्या वक्तव्याचे समर्थन हाेऊ शकत नाही.” असं म्हणत याप्रकरणावर प्रतिक्रिया देणे टाळले . तर, दुसरीकडे “अब्दुल सत्तार यांनी केलेल्या वक्तव्याची मला माहिती आता मिळाली आहे. सुप्रिया सुळे या जेष्ठ नेत्या आहेत. अब्दुल सत्तार यांच्याकडून तसं काही वक्तव्य झालं असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो.” अशा शब्दांत शिंदे गटाचे प्रवक्ते आणि राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिलगिरी व्यक्त केली.

दरम्यान, राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत चुकीचे वक्तव्य केल्याने राज्यात राष्ट्रवादीसह विविध महिला संघटना आक्रमक झाल्या आहेत. सत्तार यांचा ठिक ठिकाणी निषेध नाेंदविला जात आहे. विशेष म्हणजे त्यांच्या या विधानानंतर अनेक राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अब्दुल सत्तार यांच्या मुंबईतील घराजवळ जमाव केला आणि त्या ठिकाणी दगडफेक केली असल्याची माहिती देखील समोर आली आहे.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!