32 C
Mumbai
Friday, September 2, 2022
घरमहाराष्ट्रAbdul Sattar : शिक्षक भरती घोटाळ्याचे धागेदोर अब्दुल सत्तार यांच्यापर्यंत !

Abdul Sattar : शिक्षक भरती घोटाळ्याचे धागेदोर अब्दुल सत्तार यांच्यापर्यंत !

टीईटी घोटाळा म्हणजेच शिक्षक भरती घोटाळा प्रकरण चांगलेच तापले आहे. या घोटाळ्यामध्ये अनेक शिक्षकांना अपात्र घोषित करण्यात आलेले आहे. या प्रकरणामध्ये आता शिवसेनेशी बंडखोरी केलेले आणि एकनाथ शिंदे गटात असलेले ज्येष्ठ नेते अब्दुल सत्तार यांच्या मुलीची नावे समोर आली आहे.

टीईटी घोटाळा म्हणजेच शिक्षक भरती घोटाळा प्रकरण चांगलेच तापले आहे. या घोटाळ्यामध्ये अनेक शिक्षकांना अपात्र घोषित करण्यात आलेले आहे. या प्रकरणामध्ये आता शिवसेनेशी बंडखोरी केलेले आणि एकनाथ शिंदे गटात असलेले ज्येष्ठ नेते अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्या मुलीची नावे समोर आली आहे. अब्दुल सत्तार यांच्या मुलींनी एका एजंटला पैसे देऊन शिक्षक भरतीची परीक्षा पास केल्याची माहिती आता समोर आली आहे. ज्यामुळे खळबळ निर्माण झाली आहे. अब्दुल सत्तार यांच्या मुलींची नावे सुद्धा या घोटाळ्यात आल्यानंतर त्यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. मला बदनाम करण्यासाठी हे कटकारस्थान रचल्याचे मत स्वतः अब्दुल सत्तार यांनी प्रसार माध्यमांशी बोलता व्यक्त केले आहे.

हिना अब्दुल सत्तार आणि उझमा अब्दुल सत्तार या अब्दुल सत्तार यांच्या दोन मुलींची नावे या घोटाळ्यात आलेली आहेत. परीक्षा परिषदेकडून जाहीर करण्यात आलेल्या यादीमध्ये अब्दुल सत्तार यांच्या दोन्ही मुलींची नावे देखील लिहिलेली आहेत. ज्यामुळे आता शिक्षक भरती घोटाळ्याचे धागेदोरे हे माजी मंत्र्यांपर्यंत पोहोचलेले आहेत. २०१९ मध्ये झालेल्या टीईटी म्हणजेच शिक्षक भरती मध्ये ७८०० विद्यार्थी हे बोगस पद्धतीने शिक्षकाच्या पदासाठी पात्र ठरल्याची माहिती पुणे सायबर पोलिसांनी केलेल्या तपासात उघड झाले.

दरम्यान, आता याप्रकरणी माजी मंत्री आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील सदस्य अब्दुल सत्तार यांनी आपले मत व्यक्त केले आहे. ‘मला बदनाम करण्याचा डाव असून आमची चूक असेल तर आमच्या मुलांवर कारवाई करावी. नसेल तर हे सर्व करणाऱ्यांना फासावर लटकवा चुकीची माहिती देऊन बदनामी करणाऱ्यांवर कारवाई करावी,’ असे अब्दुल सत्तार यांच्याकडूहन सांगण्यात आले आहे.

हे सुद्धा वाचा

Eknath Shinde Cabinet Expansion: दीपक केसरकरांचे तर्कट, जेव्हा दिल्लीवाऱ्या वाढतात, तेव्हा मंत्रीपदाच्या याद्या अंतिम झाल्याचे समजायचे

Maharashtra Cabinet : अखेर मंत्रीमंडळ विस्ताराला मुहूर्त मिळाला

Nilesh Rane : निलेश राणेंनी दीपक केसरकरांना देऊ केली वाहनचालकाची नोकरी!

शिक्षक भरतीचा टीईटी घोटाळा हा महाविकास आघाडी सरकार असताना सर्वाधिक गाजला. त्यामुळे आता या घोटाळ्याचा तपास हा ईडीकडून करण्यात येणार असल्याचीच शक्यता वर्तविण्यात आली आहे. या घोटाळ्याप्रकरणी पुणे पोलिसांनी काही बड्या अधिकाऱ्यांना देखील अटक केले होते. पुणे पोलिसांकडून राज्यात घेतल्या गेलेल्या आरोग्य भरतीच्या पेपर फुटीचा तपास करण्यात येत होता. त्याचवेळी पोलिसांना म्हाडा परीक्षेचा पेपर फुटल्याचे समजले होते. म्हणून पुणे पोलिसांनी म्हाडाच्या पेपर फुटीचा तपास करण्यास सुरुवात करण्यात आली पण तेव्हाच पोलिसांना टीईटी परीक्षेत घोटाळा झाल्याचे निदर्शनास आले होते.

पृथ्वीराज चव्हाणांची अब्दुल सत्तारांवर खोचक टीका
टीईटी घोटाळ्यात अब्दुल सत्तार यांच्या मुलींची नावे समोर आल्यानंतर माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस पक्षाचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. नव्या मंत्रिमंडळात आता अब्दुल सत्तार यांनाच शिक्षण मंत्री करण्यात येईल, असा टोला पृथ्वीराज चव्हाण यांनी लगावला आहे. तसेच घड्याळाचे काटे उलटे फिरवावे लागले तर फिरवावे लागतील, पण लोकशाही वाचवावीच लागेल, असे मत सुद्धा यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांनी बोलताना व्यक्त केले आहे.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी