26 C
Mumbai
Tuesday, November 29, 2022
घरमहाराष्ट्रAbdul Sattar : कृषी मंत्री अब्दुल सत्तार बरळले; सुप्रिया सुळे यांना म्हणाले...

Abdul Sattar : कृषी मंत्री अब्दुल सत्तार बरळले; सुप्रिया सुळे यांना म्हणाले भिकार****

एका वृत्तवाहिनीशी बोलताना राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केले आहे.

काही दिवसांपूर्वीच जिल्हाधिकाऱ्यांसमोर मद्यपानासंदर्भात केलेल्या वक्तव्यामुळे चर्चेत आलेले राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यासंदर्भात अत्यंत आक्षेपार्ह विधान केले आहे.
‘ एका वृत्तवाहिनीशी बोलताना राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केले आहे. औरंगाबादच्या सिल्लोड येथे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांची जाहीर सभा होणार आहे. यासाठी कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडून आढावा घेतला जात आहे. यावेळी कृषी मंत्री सत्तार यांच्याशी वृत्तवाहिन्यांनी संवाद साधत असताना त्यांना 50 खोक्या संदर्भात सुप्रिया सुळे यांनी केलेल्या टीकेबद्दल प्रश्न विचारला असता कृषी मंत्री अब्दुल सत्तार म्हणाले ”इतकी भिकार*** झाली असेल सुप्रिया सुळे तर तिला ही देऊ” असे विधान केले.
दरम्यान कृषी मंत्री सत्तार यांच्या वक्तव्यामुळे आता राजकीय वातावरण तापले असून राष्ट्रवादीचे नेते आणि कार्यकर्ते देखील आक्रमक झाले आहेत. सत्तार यांनी माफी न मागितल्यास आमच्या भाषेत त्यांना सांगू असा इशारा राष्ट्रवादीच्या नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी दिला आहे.

दरम्यान सुप्रिया सुळे यांचे पती सदानंद सुळे यांच्या नावाने असलेल्या टि्वटर अकाऊंटवरून हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला असून, सत्तार यांच्या वक्तव्याबाबत ट्विट देखील केले आहे. त्यात म्हटले आहे ” अशी विकृती खोलवर रुजलेले नेते सुप्रिया सुळे यांच्याचकाय तर समस्त महिलांचा तिरस्कार करतात. हे मर्दुमकी दाखविणारे लोक त्यांच्या असल्या वर्तनुकीमुळे उघडे पडले आहेत. या आधी देखील असेच आधी स्वयंपाक घरात जा वगैरे असे विधान केले गेले होते. आणि आता राज्याच्या कॅबिनेट मंत्र्यांने तिला पैसे देण्याबाबत अशा पद्धतीने विधान केले आहे. हे लोक लोकप्रतिनिधी आहेत आणि ते आम्ही राज्याचा विकास करणाऱ्या सरकाचे प्रतिनिधी असल्याचा दावा करत आहेत. ते स्वत: आणि इतर लोक देखील महिलांना तुच्छ लेखतात. सुप्रिया तु चांगले काम करत रहा!. अशा निवडुन आलेल्या लोकप्रतिनिधींची मनोवृत्ती उघडी पाडण्याची शक्ती तुला आणि समस्त स्त्रीयांना खुप शक्ती मिळो.

तर राष्ट्रवादीचे नेते डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी देखील ट्विट करत कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या विधानावर हल्लाबोल केला आहे, त्यांनी ट्विटंमध्ये म्हटेल आहे की, ”अब्दुल सत्तार हे मनूवादाचे प्रचारक बनणार आहेत असं खात्रीलायक वृत्त आहे. गेले अनेक वर्षात अत्यंत कट्टर मनूवादी जन्माला आलेला नव्हता. तो अब्दुल सत्तार ह्यांच्या नावाने आता आला आहे. सनातन धर्माला, मनूवादाला आता नवीन चेहरा मिळाला आहे. त्या चेहऱ्याचे नाव आहे अब्दुल सत्तार.”

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!