31 C
Mumbai
Thursday, November 17, 2022
घरमहाराष्ट्रAbhijeet Deshpande : 'केलेल्या कृत्यासाठी महाराजांची माफी मागा!' अभिजित देशापांडेंचा जितेंद्र आव्हाडांना...

Abhijeet Deshpande : ‘केलेल्या कृत्यासाठी महाराजांची माफी मागा!’ अभिजित देशापांडेंचा जितेंद्र आव्हाडांना इशारा

जितेंद्र आव्हाड यांनी छत्रपती शिवरायांची माफी मागावी, छत्रपतींचा सिनेमा सुरू असताना सामान्य जनतेवर हात उचलणे महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणारे नाही, अशी टीका केली आहे.

राज्यात सध्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारलेल्या चित्रपटांवरून वादविवाद सुरू आहेत. रविवारी (6 नोव्हेंबर) छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज माजी राज्यसभा खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी पत्रकार परिषद घेत ऐतिहासिक सिनेमांचा निषेध केला होता. शिवाय आगामी काळात इतिहासाची मोडतोड करून चित्रपटात दाखवू नये असा धमकीवजा इशारा दिला होता. त्यानंतर राज्यभरात राष्ट्रवादी कांग्रेस आणि संभाजी ब्रिगेड आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. शिवाय सोमवारी (7 नोव्हेंबर) ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सिनेमाचा सुरू असलेला शो बंद करत प्रेक्षकांना मारहाण केल्याची घटना समोर आली होती. त्यानंतर आता ‘हर हर महादेव’ चित्रपटाचे दिग्दर्शक अभिजित देशपांडे यांनी पत्रकार परिषद घेत याप्रकरणावर भाष्य केलं आहे.

‘हर हर महादेव’ चित्रपटाचे दिग्दर्शक अभिजित देशपांडे यांनी सोमवारी ठण्यात घडलेल्या घटनेचा निषेध व्यक्त केला आहे. शिवाय प्रेक्षकाला मारहाण केल्या प्रकरणी जितेंद्र आव्हाड यांनी छत्रपती शिवरायांची माफी मागावी, छत्रपतींचा सिनेमा सुरू असताना सामान्य जनतेवर हात उचलणे महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणारे नाही, अशी टीका केली आहे. शिवाय काही दिवसांत युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी सिनेमा पाहण्यासाठी आमंत्रित करणार असून त्यांना कोणत्या घटनेबाबत आक्षेप आहे याबाबत माहिती घेणार असल्याचेही अभिजित देशपांडे यांनी यावेळी स्पष्ट केले.

हे सुद्धा वाचा

Thane News : महाराजांच्या सिनेमावरून ठाकरे-पवार रणांगणात

Rocking Star Yash : ‘बिग बी अन् रजनीकांत’ यांसारख्या दिग्गजांच्या लीगमध्ये रॉकिंग स्टार यश

JEE Mains Updates : NTA लवकरच जेईई मेन 2023 तारखा जारी करेल! वाचा सविस्तर तपशिल

शिवाय हा चित्रपट रिलीज करण्यापूर्वी राष्ट्रीय सेंसॉर बोर्डाकडे सिनेमा तयार करण्यासाठी आवश्यक असणारे सर्व ऐतिहासिक दस्ताऐवज जमा केले होते. शिवाय स्वतः संभाजी राजे यांनी उदाहरण दिलेल्या गजानन मेहंदळे यांनी लिहिलेल्या पुस्तकाचाही संदर्भ चित्रपटी निर्मिती वेळी घेतला असल्याची माहिती अभिजित देशपांडे यांनी दिली आहे. त्यामुळे सध्या महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस आणि संभाजी ब्रिगेड द्वेशाचे आणि जातीय तेढ निर्माण करणारे राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहेत असा आरोपही यावेळी अभिजित देशपांडे यांनी केला आहे.

दरम्यान, सोमवारी ‘हर हर महादेव’ या सिनेमावरून तुफान राडा झाला. जितेंद्र आव्हाड यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांनी विवियाना मॉलमधील सिनेमाचचा सुरू असलेला शो बंद करत प्रेक्षकांना मारहाण केली असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. विशेष म्हणजे या सिनेमाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आवाज देण्यात आला आहे. त्यामुळे राज्यभरात मनसे आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. विशएष बाब म्हणजे मंगळवारी (8 नोव्हेंबर) ठाण्याचे मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी जितेंद्र आव्हाड यांच्या घरासमोरील विवियाना मॉल येथे सांयंकाळी 6 वाजता सिनेमाचा मोफत शो आयोजित केला आहे.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!