28 C
Mumbai
Monday, November 21, 2022
घरमहाराष्ट्रAccident Update : मध्यरात्री भीषण अपघात; चिमुकल्या बाळासह 11 जणांनी गमावला जीव

Accident Update : मध्यरात्री भीषण अपघात; चिमुकल्या बाळासह 11 जणांनी गमावला जीव

मध्य प्रदेश येथील बैतुल जिल्ह्याच्या परिसरात हा भीषण अपघात घडला. या दुर्दैवी घटनेत बस आणि कारची समोरासमोर धडक बसली. ही धडक इतकी भीषण होती यामध्ये ११ जणांचा जागीच मृत्यू झाला.

मध्यप्रदेशात काल मध्यरात्रीच्या सुमारास भीषण अपघात घडला. या घटनेत एका बसने कारला जोरदार धडक दिली, धडक एवढी जोरदार होती की यामध्ये चिमुकल्या बाळासह तब्बल 11 जणांचा जागीत मृत्यू झाला. सदर घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली त्यानंतर अपघातात बळी पडलेले सगळेच जण कामगार असून ते महाराष्ट्रातील असल्याचे त्यांनी सांगितले. सदर घटनेबाबत सविस्तर माहिती उपलब्ध नसली तरी या अपघातात 11 जणांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. बैतुल येथे रात्रीच्या सुमारास अपघात झाला असून हे सगळेच कामगार अमरावतीला निघाले असल्याचे सांगण्यात येत आहे.

हाती आलेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेश येथील बैतुल जिल्ह्याच्या परिसरात हा भीषण अपघात घडला. या दुर्दैवी घटनेत बस आणि कारची समोरासमोर धडक बसली. ही धडक इतकी भीषण होती यामध्ये 11 जणांचा जागीच मृत्यू झाला, तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. अपघातात जीव गमावणारे सगळेच कामगार अमरावतीला जात असल्याची माहिती समोर आली आहे. गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीस उपचारांसाठी तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, सदर कामगार अमरावतीच्या दिशेने जात असताना रात्री दोन वाजचा एका बसने त्यांच्या एसयुव्ही कारला जोरदार धडक दिली. बसच्या धडकेने एसयुव्ही बसच्या आतमध्ये घुसली आणि तिचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. कारच बसमध्ये घुसल्यामुळे पोलिसांनी कारचा पत्रा कापून काढत त्यातील मृतदेह बाहेर काढले असल्याची माहिती बेतुलचे पोलीस अधिक्षक सिमला प्रसाद यांनी दिली आहे. दरम्यान सदर प्रकरणी पोलिसांचा आणखी तपास सुरू आहे.

हे सुद्धा वाचा…

Ajit Pawar : या सरकारचा पर्दाफाश करणार, अजित पवारांकडून सूचक वक्तव्य

Jobs in IT Sector in India : ही भारतीय IT कंपनी 20,000 लोकांना देणार नोकऱ्या! जाणून घ्या संपूर्ण माहिती

Dairy Products : बऱ्याच लोकांना दुग्धजन्य पदार्थ सोडणे आवश्यक आहे, कारणे जाणून घ्या

एकिकडे रस्ता सुरक्षिततेचा मुद्दा वारंवार उपस्थित होत असताना सेफ ड्रायव्हिंगकडे सपशेल दुर्लक्ष होत असल्याचे या निमित्ताने पुन्हा दिसून आले. रस्ते अपघातात मृत्यू होणाऱ्यांची संख्या दरवर्षी मोठीच पाहायला मिळते परंतु त्यावर योग्य अंमलबजावणी होत असल्याचे मात्र दिसून येत नाही. दरम्यान सायरस मिस्त्री, विनायक मेटे यांच्या अपघाती मृत्यूनंतर रस्ता सुरक्षिततेचा मुद्दा आवर्जून उपस्थित केला गेला. त्यावर पर्याय म्हणून दुचाकीधारकांना हेल्मेटसक्ती आणि कारचालकांना सगळ्यांना सिटबेल्ट अनिवार्य करण्यात आले आहे. परंतु या सगळ्याच गोष्टींसाठी जनजागृतीची गरज आहे त्यामुळे ती कशी होणार आणि रस्ते अपघातातील मृत्यू केव्हा थांबणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!