27 C
Mumbai
Saturday, September 2, 2023
घरमनोरंजनआपला लाडका मॅडी झाला एफटीआयआयचा अध्यक्ष

आपला लाडका मॅडी झाला एफटीआयआयचा अध्यक्ष

अभिनेता आर. माधवन यांची फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एफटीआयआयचे) चे अध्यक्ष आणि गव्हर्निंग कौन्सिलचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी एक्स सोशल मीडियावर (पूर्वीचे ट्विटर) वर याबाबत घोषणा केली. एफटीआयआय आणि गव्हर्निंग कौन्सिलच्या अध्यक्ष पदावर नियुक्त झाल्याबद्दल आर. माधवन यांचं अभिनंदन. माधवन यांचा सिनेमा विश्वातील अफाट अनुभव आणि भक्कम नीतिमत्ता या संस्थेला समृद्ध करेल, संस्थेत सकारात्मक बदल घडो आणि संस्था उच्च पातळीवर जावो, अशी आशा ठाकूर यांनी व्यक्त केली.

आर. माधवन यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘रॉकेटरी’ या सिनेमाला नुकताच 69 वा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. दिग्दर्शनाच्या पदार्पणातच ‘रॉकेटरी’सारखा सिनेमा हाताळल्याबद्दल आर माधवन यांचे सर्व स्तरातून कौतुक झाले. आर. माधवन यांनी हिंदीसह तामिळ आणि तेलुगु चित्रपटांमध्ये तीस वर्षाहून अधिक काळ काम केलं आहे. हिंदी मालिकांमधून आर.माधवन यांच्या कारकिर्दीला सुरुवात झाली.

इंडस्ट्रीत गॉडफादर नसताना आर. माधवन यांनी स्वतःची ओळख निर्माण केली. अभिनेत्री दिया मिर्झासोबत ‘रहना है तेरे दिल में’ चित्रपट आजही तरुण-तरुणींच्या गळ्यातील ताईत बनून राहिला आहे. वीस वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाची गाणी आजही लोकप्रिय आहेत. या चित्रपटानंतर आर माधवन यांना ‘मॅडी’ असं नाव पडलं. हिंदीत वेगळ्या धाटणीच्या भूमिका करू नये आर माधवन यांच्या चित्रपटांना फारसं यश लाभत नव्हतं. तामिळ सिनेमात आर माधवन यांना विशेष प्रसिद्धी मिळाली. दोन वर्षांपूर्वी आर माधवन यांनी ओटीटी प्लॅटफॉर्मवर डेब्यूट केलं. आर माधवन यांच्या ‘ब्रिथ’, ‘डीकपल’ या दोन वेब सिरीज विशेष गाजल्या.

हे ही वाचा 

बिग बींसोबत किंग खान; 17 वर्षानंतर जोडी येणार एकत्र

‘गदर2’ मुळे सनी देओलला सुगीचे दिवस; 500 कोटींकडे वाटचाल

आलियाच्या ‘त्या’ फोटोंचा सोशल मीडियावर धुमाकूळ

भारतीय वैज्ञानिक नंबी नारायण यांच्या जीवनावर आधारित रॉकेटरी सिनेमाच्या निर्मितीसाठी आर. माधवन यांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागले. रॉकेटरीच्या तयारीसाठी मला इतर प्रकल्पांवर पाणी सोडावे लागले. पैसा उभारण्यासाठी राहते घर विकावे लागले, अशी कबुली आर. माधवन यांनी एका मुलाखतीदरम्यान दिली.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी