शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी मातोश्री येथे पत्रकार परिषद केली होती. यावेळी त्यांनी महायुती सरकारच्या भ्रष्ट कारभारावर टीका करतानाच बेरोजगारांना नोकरी देण्याचं आश्वासन आणि लाडकी बहीण योजना सुरू ठेवण्याचं आश्वासन दिलं. (Aditya Thackeray criticized the Maharashtra government)
पत्रकार परिषदेत बोलतांना आदित्य म्हणाले, ‘हा महायुतीचा रिपोर्ट कार्ड नाही, तर सगळं गुजरातला पाठवण्याचा डीपोर्ट कार्ड’. असं म्हणत त्यांनी महायुतीची टीका केली. भाजपची पोलीसी डिव्हीईड अँड रूलची आहे. आता निवडणूक लागली आहे, त्यामुळे आता ते सगळीकडे वाद लावण्याच काम करतील, असं आदित्य ठाकरे म्हणाले. (Aditya Thackeray criticized the Maharashtra government)
विकास ठाकरे यांनी MSRTC च्या ७०,३७८ कोटींच्या करारावर घेतला आक्षेप
तसेच PAP प्रकल्प मुलुंड मध्ये रद्द झाला का ? हा सवाल सरकारला करतानाच आमचा सरकार आल्यावर आम्ही घाई गडबडीत आणि केवळ भ्ष्टाचारासाठी घेतलेले सगळे टेंडर रद्द करणार आहोत, असा इशारा दिला. आत्ता महाराष्ट्रला लुटण्याचा काम हे सरकार करतय . यासाठी BMC निवडणुका २ वर्ष घेतल्या गेल्या नाहीत अशीही टीका त्यांनी केली. (Aditya Thackeray criticized the Maharashtra government)
महाराष्ट्रात 20 नोव्हेंबरला मतदान, 23 नोव्हेंबरला निकाल
राज्यातील सरकार हे केवळ अडनिसाठी काम करत आहे . अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली . यावेळी बोलताना ‘आचारसंहिता लागण्यापूर्वी देवनारचा भूखंड सरकारने अदानीला दिला, प्रत्येक मंत्रिमंडळ बैठकीत लोकांना आम्ही काही देत आहोत असा दाखवलं . धारावी प्रकल्पसाठी एकूण १०८० एकर मुंबईची जमीन अदानीच्या घश्यात फुकटात घातली . पुढच सरकार यांचं आलं तर अरबी समुद्रालासुद्धा अदानीचे नाव देतील . देवनारचा जो भूखंड अदानीला दिला त्यात राज्य सरकार आणि बीएमसी मध्ये वाद होता कोर्टात मॅटर असताना ही जागा फुकट दिली . भाजप आणि शिंदे यांचे मालक अदानी आहेत त्यासाठी हे सगळं करताय . मी जे बोलतोय जे मुद्दे उपस्थित करतोय त्यांनी खोडून काढाव, एक जरी मंत्री बोलतोय का? लँड प्रीमियम बद्दल कोणी काही बोललं ? ७ लाख स्केअर फूटच काम या धारावी प्रकल्प मध्ये करणार आहेत . यामध्ये धारावी सोडून हे काम होताय यामध्ये अदानी १ लाख कोटी रुपये कमावणार आहे . सबका मालिक एक साईबाबा आहेत, पण सरकारसाठी सबका मालिक अदानी झालाय’ . असं टीकास्त्र आदित्य ठाकरे यांनी सरकारवर डागलं. (Aditya Thackeray criticized the Maharashtra government)
महायुती सरकारने मंत्री मंडळांच्या शेवटच्या बैठकांमध्ये निर्णयांचा धडाका लावला होता. अनेक निर्णय जनतेला आकर्षित करण्यासाठी घेण्यात आले होते . त्यावर बोलताना ‘महायुतीही महाझुटी आहे’ . अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली . तसेच मुख्यमंत्री कुठे भेटायचे ते सांगा . भेटू आणि सगळ्यावर चर्चा करायला मी तयार आहे . असं थेट आव्हान आदित्य ठाकरे यांनी दिलं . यावेळी बोलताना . मुंबईत टोल फ्री केला, टोल ४५-५० रुपये होता . लोकांना काहीतरी देतो हे दाखवून त्याच्या आड बऱ्याच गोष्टी या सरकारने केल्या आहेत . ५० रुपयांची सूट तुम्हाला दिली जाते पण त्याऐवजी ५० हजार कोटी फायदा करून घेतायत, असं आदित्य ठाकरे म्हणाले. (Aditya Thackeray criticized the Maharashtra government)
लाडकी बहिण योजने बाबत मविआ सरकार आल्यावर बंद केली जाणार असल्याचा दावा सरकार मधील पक्षांकडून केला जात आहे . त्यावर आदित्य ठाकरे यांनी ‘आम्ही लाडकी बहिणीला दीड हजार पेक्षा जास्त पैसे देऊ, वाढीव पैसे आम्ही देऊ. आम्ही भाजप सरकार नाही,’ असं आश्वासन आदित्य ठाकरे यांनी दिलं. (Aditya Thackeray criticized the Maharashtra government)