33 C
Mumbai
Thursday, April 18, 2024
Homeमहाराष्ट्रBharat Jodo Yatra in Maharashtra: भारत जोडो यात्रेत आदित्य ठाकरे होणार सहभागी

Bharat Jodo Yatra in Maharashtra: भारत जोडो यात्रेत आदित्य ठाकरे होणार सहभागी

भारत जोडो यात्रेत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे अनेक नेते सहभागी होणार आहेत. तर काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत आदित्य ठाकरे सहभागी होण्याची शक्यता आहे. याबाबतची माहिती उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील एका नेत्याकडून देण्यात आली आहे.

7 सप्टेंबरला कन्याकुमारी येथून सुरु झालेली राहुल गांधी यांची ‘भारत जोडो यात्रा’ सोमवारी रात्री हजारो किलोमीटरचा प्रवास करून नांदेड जिल्ह्यात दाखल झाली. यावेळी अनेक काँग्रेस कार्यकर्ते त्याठिकाणी दाखल झाले होते. राहुल गांधी यांच्या नेतृत्वात सुरु असलेल्या या भारत जोडो यात्रेत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे अनेक नेते सहभागी होणार आहेत. तर काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत आदित्य ठाकरे सहभागी होण्याची शक्यता आहे. याबाबतची माहिती उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील एका नेत्याकडून देण्यात आली आहे. शिवसेनेचे अनेक नेते देखील या यात्रेमध्ये सहभागी होणार आहेत. तसेच उद्धव ठाकरे देखील या यात्रेत सहभागी होणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.

काँग्रेसची भारत जोडो यात्रा सोमवारी (ता. 7 ऑक्टोबर) रात्री महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यात दाखल झाली. यावेळी राहुल गांधी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे दर्शन घेतले. याठिकाणी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, काँग्रेसचे नेते माणिकराव ठाकरे तसेच इतर नेते उपस्थित होते.

दरम्यान, राहुल गांधी यांच्या नेतृत्वात सुरु असलेल्या भारत जोडो यात्रेमध्ये आदित्य ठाकरे देखील सहभागी होणार असल्याची माहिती शिवसेना नेते सचिन अहिर यांच्याकडून देण्यात आली. आदित्य ठाकरे मराठवाड्याच्या दौऱ्यावर येत असून काँग्रेसची पदयात्रा सुद्धा याच भागातून जाणार आहे. त्यामुळे भारत जोडो यात्रेत आदित्य ठाकरे सहभागी होण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी माहिती सचिन अहिर यांच्याकडून देण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा

Bharat Jodo Yatra in Maharashtra : भारत जोडो यात्रेला मोठा धक्का; काँग्रेस सेवादलाच्या राष्ट्रीय सरचिटणीसांचा यात्रेदरम्यान मृत्यू

Mumbai News : वरळीत पोटनिवडणूकची हिंमत दाखवा!; आशिष शेलार यांचे ठाकरेंना आव्हान

Abdul Sattar : अब्दुल सत्तार हे संस्कार नसलेले आदीमानव!; अनिल गोटे यांचा हल्लाबोल

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करूनच याबाबत निर्णय घेतला जाईल. योगायोगाने, यावेळी आदित्य ठाकरे हे मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत आणि काँग्रेसचा दौरा आदित्य ठाकरेंच्या वेळापत्रकाशी जुळेल का ? यासाठी प्रयत्न सुरु आहेत. तसेच भारत जोडो यात्रेमागील संकल्पना सर्वांना एकत्र आणण्याचा असून समाजातील सर्व स्तरातील लोक या भारत जोडो पदयात्रेला पाठिंबा देत आहेत. ते महाराष्ट्रात येत असतील तर त्याचे स्वागतच करायला हवे, असे देखील शिवसेनेच्या नेत्याकडून सांगण्यात आले आहे.

भारत जोडो पदयात्रेमध्ये ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्दाहव ठाकरे देखील सहभागी होणार असल्याचे बोलले जात आहे. उद्धव ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत या पदयात्रेत सहभागी होणार आहेत. येत्या 10 नोव्हेंबरला उद्धव ठाकरे आणि शरद पवार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत सहभागी होण्याचे बोलले जात आहेत. याचेवेळी महाविकास आघाडीचे इतर नेतेही सहभागी होतील.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी