28 C
Mumbai
Thursday, December 7, 2023
घरमहाराष्ट्रBhagat Singh Koshyari : ग्रामपंचायतीचा कौतुकास्पद ठराव, राज्यपालांना हटवा!

Bhagat Singh Koshyari : ग्रामपंचायतीचा कौतुकास्पद ठराव, राज्यपालांना हटवा!

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे कोश्यारी यांच्याविरोधात राज्यभर असंतोष वाढला आहे. अनेक संघटना, पक्ष, राजकीय नेत्यांनी कोश्यारी यांना महाराष्ट्रातून परत पाठवण्याची मागणी केली आहे. त्यातच आता नाशिक जिल्ह्यातील जोखरी गावाने मंगळवारी (दि. 22) थेट राज्यपालांना हटविण्याबाबत ग्रामसभा घेवून ठरावच पास केला आहे.

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे कोश्यारी यांच्याविरोधात राज्यभर असंतोष वाढला आहे. अनेक संघटना, पक्ष, राजकीय नेत्यांनी कोश्यारी यांना महाराष्ट्रातून परत पाठवण्याची मागणी केली आहे. त्यातच आता नाशिक जिल्ह्यातील जोखरी गावाने मंगळवारी (दि. 22) थेट राज्यपालांना हटविण्याबाबत ग्रामसभा घेवून ठरावच पास केला आहे.

गेल्या दोन तीन दिवसांपासून राज्यपाल कोश्यारी यांच्याबाबत राज्यात असंतोष पसरला आहे. अनेक पक्ष, संघटना, नेत्यांनी राज्यपालांना महाराष्ट्रातून परत पाठविण्याची मागणी केली आहे. त्यातच आता एका गावाने ग्रामसभा घेवून तसा ठरावच केल्याने अगदी ग्रामीण भागात देखील राज्यपालांविरोधात संतापाची लाट पसरल्याचे चित्र दिसत आहे. नाशिक जिल्ह्यातील जोखरी गावातील ग्रामस्थांनी ग्रामसभेत या ठरावाला एकमुखी पाठिंबा देत हा ठराव पास केला. यावेळी गावातील तरुणांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. या ठरावाची नियमानुसार प्रक्रिया राबविणार असल्याचे देखील ग्रामपंचायत सदस्यांनी सांगितले. यावेळी राज्यपालांच्या पुतळ्याला जोडो मारो आंदोलन करत ग्रामस्थानी राज्यपालांचा तीव्र निषेध व्यक्त करत आंदोलन देखील केले.

यावेळी भाजपवर देखील ग्रामस्थानी जोरदार टीका केली. भाजपचे प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी एका वृत्तवाहिनीवर बोलताना शिवरायांबाबत असेच वादग्रस्त वक्तव्य केले होते. भाजप नेत्यांकडून जाणीवपूर्वक अशी वक्तव्ये केली जात असून त्यांना गर्व झाला आहे, अशी टीका देखील यावेळी ग्रामस्थांनी केली. राज्यपाल हटवा आणि महाराष्ट्र वाचवा असे आमचे मत आहे, असे यावेळी सदस्यांनी सांगितले.

राज्यपालांची या आधी देखील वादग्रस्त वक्तव्ये

नुकताच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा दिक्षांत सोहळा झाला. या सोहळ्यात बोलताना राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी शिवाजी महाराज हे जुन्या काळातील आदर्श असल्याचे वक्तव्य केले होते. त्यांनंतर राज्यपालांवर राजभरातून टीकेची झोड ऊठली. राज्यात अनेक ठिकाणी राज्यपालांविरोधात आंदोलने देखील झाली. राज्यपालांनी या आधी देखील अशीच वादग्रस्त वक्तव्ये केल्यामुळे त्यांच्यावर टीका झाली होती. पुण्यात एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. तसेच औरंगाबादमध्येच एका कार्यक्रमात या आधी देखील त्यांनी शिवरायांबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्या नंतर आता पुन्हा त्यांनी शिवरायांबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे राज्यभरात त्यांच्याविरोधात संतापाची लाट उसळली आहे. शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्ष, काँग्रेसने राज्यपालांविरोधात राज्यभरात आंदोलने केली आहेत. त्यानंतर आता थेट नाशिक जिल्ह्यातील जोखरी गावाने राज्यपालांना हटविण्याचा ठरावच ग्रामसभेत पास केल्याने ग्रामीण भागातून देखील राज्यपालांना तीव्र विरोध होत असल्याचे चित्र आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी