26 C
Mumbai
Wednesday, November 30, 2022
घरमहाराष्ट्रDelhi Murder : दोघांनी प्रेमाच्या आणाभाका घेतल्या; त्यानं मात्र तिच्या शरिराचे 35...

Delhi Murder : दोघांनी प्रेमाच्या आणाभाका घेतल्या; त्यानं मात्र तिच्या शरिराचे 35 तुकडे केले

दिल्लीतील मेहरोली पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या एका हत्या प्रकरणाची दिल्ली पोलिसांनी उकल केली आहे. या प्रकरणी एकाला पोलिसांनी अटक केली असून त्याचे नाव अफताब असे आहे.

मुंबईतील एका तरुण तरुणीचे ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले, प्रेमाच्या आणाभाका झाल्या, एकमेकांच्या डोळ्यांमध्ये भावी आयुष्याची स्वप्ने देखील पाहिली… दिवसेंदिवस त्यांचे प्रेम फुलत असतानाच कुटुंबियांना त्यांच्या नात्याची कुणकुण लागली आणि घरातून विरोध झाला… त्यानंतर दोघांनीही घर सोडण्याचा निर्णय पक्का केला… ते दोघे मुंबईतून दिल्लीला पळून गेले…. दिल्लीत लिव्ह इनमध्ये राहू लागले… पण एक दिवस आक्रीत घडलं… त्यानं तिचा गळा आवळून खुन केला…. तिच्या शरिराचे एक दोन नव्हे, तर तब्बल 35 तुकडे केले… अतिशय थंड डोक्याने त्याने 18 दिवस रोज रात्री त्याने तिच्या मृतदेहाचे तुकडे दिल्लीतील विविध भागात फेकून विल्हेवाट लावली… त्यानंतर आता आपल्याला कोणच पकडू शकत नाही असे समजूनच तो वावरू लागला… पण त्याला माहितीच नव्हत… कानून के हात लंबे नही.. बहोत लंबे होते है!

दिल्लीतील मेहरोली पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या एका हत्या प्रकरणाची दिल्ली पोलिसांनी उकल केली आहे. या प्रकरणी एकाला पोलिसांनी अटक केली असून त्याचे नाव अफताब असे आहे. या तरुणावर श्रद्धा नामक तरुणीची हत्या केल्याचा आरोप आहे. हे दोघे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आफताबने श्रद्धाच्या शरिराचे 35 तुकडे केले होते. आरोपीने तिच्या शरिराचे तुकडे करुन फ्रिजमध्ये ठेवले होते, श्रद्धाच्या शरिराचे तुकड्यांची तब्बल 18 दिवस विल्हेवाट लावत होता.

मुंबईत राहणारी मृत तरुणी श्रद्धा आणि आरोपी तरुण अफताब यांच्या ओळखीचे प्रेमात रुपांतर झाले, मात्र त्यांच्या प्रेमाला कुटुंबियांचा विरोध होता. त्यामुळे हे दोघेजण दिल्लीला पळून आले आणि दिल्लीतील मेहरोली भागातील एका फ्लॅटमध्ये लिव्ह इन मध्ये राहू लागले. काही दिवस ते एकत्र राहिल्यानंतर मात्र अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. लिव्ह इन पार्टनर अफताबने श्रद्धाची अत्यंत निर्घृन हत्त्या केली. आणि श्रध्दाच्या मृतदेहाचे 35 तुकडे केले. त्यानंतर तिच्या तुकडे केलेल्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी तो जवळपास 18 दिवस तो ते तुकडे दिल्लीत इतरत्र फेकत होता. दरम्यान दिल्ली पोलिसांनी आज आफताबला अटक केली आहे.

आफताबने हत्येचा कटच असा रचला होता की, या खुनाची उकल करणे पोलिसांच्या देखील नाकीनऊ आले होते. अखेर शेवटी सहा महिन्यांनतर आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. आरोपीचे नाव आफताब अमीन पूनावाला असे आहे. त्याने श्रद्धाच्या शरिराचे 35 तुकडे करुन दिल्लीतील विविध ठिकाणी फेकून त्याची विल्हेवाट लावली होती. श्रद्धा ही मुळची पालघर जिल्ह्यातील रहिवासी होती.
हे सुद्धा वाचा :
Jitendra Awhad : ‘राजकारण आम्हीही केलं पण…’ विनयभंगाचा आरोप जितेंद्र आव्हाडांच्या जिव्हारी

Jitendra Awhad : विनयभंग किती खरा किती खोटा, जितेंद्र आव्हाडांनी स्वत:हूनच केला व्हिडीओ जारी

T20 World Cup Final : 1992 चा फ्लॅशबॅक फेल! इंग्लंड टी20 क्रिकेटचा नवा बादशाह

पोलिसांनी या प्रकरणाचा संपूर्ण घटनाक्रम सांगितला. 18 मे रोजी क्षुल्लक कारणावरून भांडण झाले होते. त्यातूनच आफताबने श्रद्धाची गळा दाबून हत्त्या केली. त्यानंतर त्याने श्रद्धाच्या शरिराचे 35 तुकडे केले. त्यानंतर त्याने श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे ठेवण्यासाठी फ्रिज खरेदी केला आणि फ्रिजमध्ये तिच्या शरिराचे तुकडे भरले. पुढे 18 दिवस त्याने रात्री उशीरा दिल्लीतील वेगवेगळ्या भागात हे तुकडे फेकून तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावली. अशी ही माहिती समोर आली आहे की, तो शहराबाहेर दोन किलोमीटर जंगलात श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे फेकत असे, जंगलातील प्राण्यांनी श्रद्धाच्या शरिराचे तुकडे खाल्ल्याने तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लागली.

 

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!