29 C
Mumbai
Saturday, April 20, 2024
Homeमहाराष्ट्रcontroversial statement : राज्यपालांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर शिवसेना, मनसे आक्रमक

controversial statement : राज्यपालांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर शिवसेना, मनसे आक्रमक

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा वादग्रस्त विधानांचा सपाटा काही संपण्याची चिन्हे दिसत नाहीत. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत औरंगाबादमध्ये वादग्रस्त विधान केल्यामुळे राज्यात पुन्हा वातावरण भडकले आहे, राज्यपालांच्या बाष्कळ बडबडीनंतर शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्मान सेना देखील आक्रमक झाली आहे.

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा वादग्रस्त विधानांचा सपाटा काही संपण्याची चिन्हे दिसत नाहीत. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत औरंगाबादमध्ये वादग्रस्त विधान केल्यामुळे राज्यात पुन्हा वातावरण भडकले आहे, राज्यपालांच्या बाष्कळ बडबडीनंतर शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्मान सेना देखील आक्रमक झाली आहे. औरंगाबाद येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाठवाडा विद्यापीठाच्या दिक्षांत समारंभात राज्यपाल भगतिसंग कोश्यारी यांनी ‘छत्रपती शिवाजी महाराज हे जुन्या काळातील आदर्श तर नितीन गडकरी हे नव्या युगातील आदर्श असल्याचे वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर राज्यभरातून त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. संभाजीराजे छत्रपती यांनी देखील अशा व्यक्तीला महाराष्ट्राच्या बाहेर काढा असे म्हटले आहे. त्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार रोहीत पवार, संभाजी ब्रिगेड यांनी देखील त्याचा निषेध केला होता.

राज्यपालांच्या या वक्तव्यानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) देखील आक्रमक झाली अशून
शिवसेनेच्या ठाकरे गटाने आक्रमक पवित्रा घेतल्याचं दिसून येतं. राज्यपाल यांनी छत्रपती शिवाजी महाराज हे जुने काळातील आदर्श आहेत, असे विधान केले होते. त्यावरुन, आता राजकीय पक्ष आणि संघटना आक्रमक झाल्या आहेत. शिवसेनेचे नेते आनंद दुबे यांनी राज्यपालांची महाराष्ट्राबाहेर हकालपट्टी करा, अशी मागणी केली आहे. दुबे म्हणाले शिवाजी महाराज आमच्यासाठी प्राण आहेत. राज्यपालांची महाराष्ट्राला काहीही गरज नाही त्यांना महाराष्ट्रातून हटवा, अशी मागणी दुबे यांनी केली आहे.

हे सुद्धा वाचा :

Hardik Pandya: हार्दिक पांड्या होऊ शकतो T20 क्रिकेटमध्ये भारताचा कर्णधार

Koshyari’s Controversial Statement : “अशा माणसाकडून आता दिलगिरीचीही अपेक्षा नाही !”

Koshyari’s controversial statement : राज्यपाल कोश्यारी यांचे छत्रपती शिवरायांबाबत पून्हा वादग्रस्त वक्तव्य

तर महाराष्ट्र नवनिर्मान सेनेचे प्रवक्ते गजानन काळे यांनी देखील राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यावर सडकून टीका केली आहे. गजानन काळे म्हणाले की, महाराष्ट्राच्या राज्यपालांनी पुन्हा माती खाल्ली आहे. त्यांचा परत तोल गेलाय. ज्या विषयातील कळत नाही, तिथे ज्ञान कशाला पाजळता असा सवाल देखील गजाजन काळे यांनी राज्यपालांना केला आहे. छत्रपती शिवाजी महाराज भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यात देखील आदर्श होते आणि आदर्श राहतील, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी किंवा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा आदर्श ज्यांना घ्यायचा त्यांनी निश्चित घ्यावा पण छत्रपती शिवरायांशी तुलना नको, असे गजाजन काळे यांनी म्हटले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी