29 C
Mumbai
Friday, April 19, 2024
Homeमहाराष्ट्रEknath Shide : 'शिंदे-फडणविसांनी उधळलेल्या बैलांना आवर घालावा!'; सत्तारांच्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादीतून हल्लाबोल

Eknath Shide : ‘शिंदे-फडणविसांनी उधळलेल्या बैलांना आवर घालावा!’; सत्तारांच्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादीतून हल्लाबोल

राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे आमदार शशिकांत शिंदे यांनी सत्तार यांचा खरपूस समाचार घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे त्यांच्या उधळलेल्या बैलांना आवर घालावा, जर आवर घालता येत नसेल तर जशास तसे उत्तर देऊ असा इशारा दिला आहे.

राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले. त्यानंतर राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्ते संतप्त झाले असून राज्यभरातून सत्तार यांचा निषेध केला जात आहे. अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी देखील केली जात आहे. राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे आमदार शशिकांत शिंदे यांनी सत्तार यांचा खरपूस समाचार घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे त्यांच्या उधळलेल्या बैलांना आवर घालावा, जर आवर घालता येत नसेल तर जशास तसे उत्तर देऊ असा इशारा दिला आहे.
अब्दुल सत्तार यांच्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे सध्या राजकीय वातावरण तापले असून राष्ट्रवादी कॉँग्रेस, शिवसेना (ठाकरे) आणि कॉँग्रेस पक्षातील नेते, कार्यकर्ते देखील आक्रमक झाले आहेत. अनेकांनी अब्दुल सत्तार यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. तसेच मुख्यंत्र्यांकडे सत्तार यांच्या राजीनाम्याची देखील मागणी केली आहे.

राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे आमदार शशिकांत शिंदे यांनी देखील अब्दुल सत्तार यांच्या या वक्तव्यानंतर ट्विट केले आहे, यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, ”अब्दुल सत्तार यांची सत्तेची मस्ती उतरविली जाईल, खासदार सुप्रिया सुळे यांनी सत्ताधाऱ्यांवर 50 खोक्यांचा आरोप केला. परंतू अब्दुल सत्तारांच्या नावाचा कुठेही उल्लेख न करता तो त्यांना झोंबला, याचा अर्थ ‘दाल मे कुछ काला है’ एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी उधळलेल्या बैलांना आवर घालावा, जर आवरता येत नसतील तर जशास तसे उत्तर दले जाईल, आणि सबका हिसाब होगा और जरूर होगा.”

अब्दल सत्तारांच्या विधानानतंर राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी देखील त्यांचा निषेध केला आहे, त्यांनी म्हटले आहे की, ”आज या राज्यात महिलांचा कसा अपमान केला जातो त्याचे एक उदाहरण म्हणजे या राज्य मंत्रीमंडळातील मंत्री उब्दुल सत्तार नावाचा एक मंत्री त्याने आज आदरणीय सुप्रिया सुळे ताईंबद्दल जो अपशब्द काढला, मी त्या सत्ताराबद्दल एक बोलू इच्छितो… सत्तार याने जो ताईंबद्दल अपशब्द वापरला त्या सत्तारला सत्तेचा माज आला आहे. मी तर सत्तार याला जाहिर आव्हान करतो सत्तार तू ज्या मागे पुढे लालदिव्याच्या गाड्या घेऊन फिरतो ना त्या गाड्या घेऊन ये तुला कसा नगर जिल्ह्यातून जाऊ द्यायचे ते मी पाहतो. आदरणीय ताईंबद्दल अपशब्द वापरता तुम्ही तुम्हाला शोभले पाहिजे, राज्य मंत्री म्हणूण देखील राहण्याची तुमची लायकी नाही तुला तर मी जाहिर आव्हान करतो, तु कसा पोलिस प्रशासनाचा ताफा घेऊन ये नाहीतर काही घेऊन ये तुला त्या ठिकाणाहून जाऊ दिले जाणार नाही. तुझ्या गाडीच्या काचा कशा फोडतो सत्तार तुला या महाराष्ट्रातील तमाम आया बहिनींच्या वतीने तुझा निषेध व्यक्त करतो.” अशा शब्दात आमदार निलेश लंके यांनी कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांना आव्हान दिले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी