34 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्रThe path of fire :'अग्न‍िपथ' योजनेबद्दल जनजागृती करणाऱ्या 'भारत के अग्निवीर' चित्रपटाचा...

The path of fire :’अग्न‍िपथ’ योजनेबद्दल जनजागृती करणाऱ्या ‘भारत के अग्निवीर’ चित्रपटाचा मुहूर्त राज्यपालांच्या हस्ते

'अग्न‍िपथ' योजनेबद्दल जनजागृती करणाऱ्या चित्रपटाचा मुहूर्त भगतसिंह कोश्यारी यांच्या उपस्थितीत पार पडला. केंद्र शासनाच्या 'अग्न‍िपथ' योजनेबद्दल युवकांमध्ये जनजागृती करण्याच्या उद्देशाने हा चित्रपट तयार करण्यात येत आहे.

‘अग्न‍िपथ’ योजनेबद्दल जनजागृती करणाऱ्या चित्रपटाचा मुहूर्त भगतसिंह कोश्यारी यांच्या उपस्थितीत पार पडला. केंद्र शासनाच्या ‘अग्न‍िपथ’ (the path of fire) योजनेबद्दल युवकांमध्ये जनजागृती करण्याच्या उद्देशाने हा चित्रपट तयार करण्यात येत आहे. ‘भारत के अग्निवीर’ या चित्रपटाचा मुहूर्त सोहळा तसेच पोस्टरचे प्रकाशन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते आज राजभवन येथे करण्यात आले. ‘भारत के अग्निवीर’ हा चित्रपट विविध भाषांमध्ये तयार करण्यात येणार आहे. महंत रवींद्र पुरी क्रिएशन्स व सत्य ऑनलाईन प्रॉडक्शनद्वारे हा ‘भारत के अग्निवीर’ हा चित्रपट तयार केला जात आहे.

या प्रकाश सोहळयाला अध्यात्मिक गुरु राजेंद्र महाराज तसचे न‍िरंजन आखाडयाचे महंत केशव पूरी, चित्रपटाचे निर्माते पुरुषेत्तम शर्मा व अखिल भारतीय तीर्थ पुरोहित महासभेचे प्रवक्ते अविक्षित रमण हे‍ देखील उपस्थित होते.साधारपणे दोन महिन्यांपूर्वी केंद्र सरकारने ‘अग्निपथ’ योजनेची घोषणा केली होती. या योजनेमुळे देशभरात मोठा वाद निर्माण झाला होता. अनेक ठिकाणी या योजनेला विरोध करयासाठी आंदोलने देखील करण्यात आली होती.

हे सुद्धा वाचा

Pune NCP : पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसने सरकारविरोधात आंदोलन करत खेळले खेळ

Ajit Pawar : ‘अजितदादा म्हणतात, तुला काही कळत नाही…’

PWD : पीडब्ल्यूडी मंत्र्यांनी अध‍िकाऱ्यांना दिल्या महत्वाच्या सूचना

साधारपणे दोन महिन्यांपूर्वी केंद्र सरकारने ‘अग्निपथ’ योजनेची घोषणा केली होती. या योजनेमुळे देशभरात मोठा वाद निर्माण झाला होता. अनेक ठिकाणी या योजनेला विरोध करयासाठी आंदोलने देखील करण्यात आली होती. आता याच ‘अग्निपथ’ योजनेची जाहितरात करण्याच्या हेतूने हा ‘भारत के अग्निवीर’ चित्रपट तयार करण्यात येत असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

आता बहूतेक कॉलेजचे निकाल लागले आहेत. त्यानंतर बहूदा या योजनेला विदयार्थ्यांनी चांगला प्रतिसाद दिला नसण्याची शक्यात आहे. त्यामुळे सरकारने हे धोरण अवलंबले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. शिवाय या चित्रपटाच्या मुहूर्तासाठी अध्यात्मिक लोकांना बोलवण्यात आले आहे. आशा प्रकारे भाजप नेहमीच लोकांना भावनिकतेमध्ये गुंतवण्याचे काम करत आला आहे. यावेळी देखील त्यांनी याच युक्तीचा वापर केल्याचे दिसून येते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी